स्वप्न वास्तविकता नसते
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2016 04:32 PM2016-07-20T16:32:27+5:302016-07-20T22:02:27+5:30
स्वप्नांना कधीही वास्तविक तेचा जोड देऊ नये.
Next
रात्रीला अनेकजणांना वेगवेगळी स्वप्न पडतात. त्यामध्ये सकारात्मक व भिती वाटणाºया स्वप्नांचा समावेश असतो. परंतु, स्वप्न ही मृगळाप्रमाणेच असून, ती फक्त बंद डोळ्यांनी बघायला चांगली वाटतात. स्वप्नांना कधीही वास्तविक तेचा जोड देऊ नये. कारण की, खूप कमी स्वप्न ही सत्यात उतरत असतात. त्यामुळे पराकाष्ठा केल्याशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही. यामध्ये स्वप्नाविषयी आपण जाणूया घेऊया माहिती...
स्वप्न हे रॅपीड आय मुमेंटमध्ये पडते. एका रात्रीत अनेक स्वप्न पडतात, एका स्वप्नाची मर्यादा ही ५ मिनिटे ते २० मिन्ािटापर्यंत असते. संपूर्ण स्वप्न हे कधीच लक्षात नाही. त्यामुळे सकाळी उठून तो सांगण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही त्याचा काही भाग हा हमखास विसरलेला असतो. रात्री पडणाºया स्वप्नामध्ये जवळपास ८० टक्के स्वप्न ही रंगीत असतात. या रंगीत स्वप्नात इच्छा असूनही आपण ते वास्तविक जीवनात पूर्ण करु शकत नाही. अशा स्वप्नांचा यात समावेश असतो.
स्त्री व पुरुषांच्या स्वप्नात फरक
स्त्री व पुरुष यांच्या स्वप्नात फरक असतो. स्त्रियांच्या स्वप्नात नवरा, सासू, मैत्रिणी, मुलगा, मुलगी आदी नाते असलेले व्यक्ती येतात. पुरुषापेक्षा स्त्रियांना पडणारे स्वप्न हे जास्तवेळ चालते. विशेषकरुन पुरुषांना पडणारी स्वप्न ही जास्त आक्रमक असतात. यामध्ये केंद्रस्थानी ते स्वत: असतात. स्त्रियांच्या स्वप्नात मात्र त्या केंद्रस्थानी राहत नाही. मात्र, दोघांच्याही स्वप्नात नकारात्मक भावना जास्त असतात.
का नाही लक्षात राहत स्वप्न
स्वप्न ही रॅपीड आय मुमेंट (फॅडल लोभ) मध्ये पडतात. त्यामुळे ती स्वत: ला लक्षात राहत नाही. व आपली हालचालही होत नाही. यामध्ये आपण दचकून उठत असतो. स्वप्नांमुळे मानसिक स्वास्थ सुद्धा राखता येते. परंतु, त्याला वास्तविक तेचा जोड देण्याचा प्रयत्न करु नका. भिती वाटणारी स्वप्न असली तर काहीजण मांत्रिकाकडेही उपचार घेतात. त्याऐवजी समुपदेशाकडे जाऊन सल्ला घेणे आवश्यक आहे.
स्वप्न पडण्याची कारणे
स्वप्न पडणे ही सुद्ध एक विकृती असून, स्वप्न ही वैद्यकीय उपचाराने बरी होतात. जवळपास ५० टक्के स्वप्न ही शारीरिक विकृतीमुळे पडतात. वासना अतृप्त राहिल्याने वासना पूर्तीची स्वप्ने पडतात. हल्लीचे जीवन हे खूप धावपळीचे झाले आहे. समाधानी वृत्ती बनविली तर ही स्वप्ने पडणे आपल्याला टाळता येतात.
स्वप्नाच्या कल्पना
जास्तीत जास्त स्वप्ने ही रात्री पडतात. त्यासोबतच अनेक कल्पना आपल्याकडे प्रचलीत आहेत.
यामध्ये रात्रीचे सुरुवातीला पडणारी स्वप्ने ही काही वर्षांनंतर तर मध्यरात्रीला पडणारी स्वप्न ही सहा महिन्यात पूर्ण होतात. सकाळी पडणारी स्वप्ने ही १५ दिवसांमध्ये पूर्ण होतात. स्वप्नात स्वत: ला जेवताना पाहणे हे अशुभ मानले जाते अशा विविध स्वप्नाच्या कल्पना आहेत.
चित्रपटातील स्वप्न सत्यात उतरते
स्वप्नाचा वास्तवीक जीवनाशी काहीही संबंध नसतो. जे स्वप्नामध्ये घडत असते, ते वास्तविकतेमध्ये कधीही पूर्ण होत नाही. मात्र, चित्रपटामध्ये हे उलटे आहे. अभिनेत्याने झोपेत पाहिलेले स्वप्न हे मात्र पूर्ण होते. प्रत्येक अभिनेत्याला त्याला आवडणाºया अभिनेत्रीचे स्वप्न पडताना दाखविले जाते. व त्या स्वप्नानंतर त्याचे प्रेमप्रकरणही सुरु होते. मराठी व हिंदीसह सर्वच चित्रपटात हे हमखास पाहावयला मिळते.