चरबी घटवण्यास मदत करणारी पेयं!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2016 11:20 AM2016-04-21T11:20:28+5:302016-04-21T16:50:28+5:30
काही पेयांचं सेवन केल्यानेही पोटाची चरबी कमी करु शकता.
ग्रीन टी : नियमित ग्रीन टी प्यायल्याने तुम्ही सहजरित्या वजन कमी करु शकता. मोठ्या प्रमाणात अँटीआॅक्सिडंट असलेल्या ग्रीन टीमुळे चयापचय क्रिया सुधारते. यामुळे पोटाची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
कलिंगडाचा रस : लो कॅलरी असलेला कलिंगडाचा रस पोटाची चरबी घटवण्यात मदत करतो. कलिंगडमध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असल्याने तो शरीरासाठी अतिशय उत्तम आहे.
मिंट आईस्ड टी : मिंट टीमुळे शरीरात गॅस कमी तयार होता. वजन कमी करण्यात मिंट टीपेक्षा चांगला पर्याय नाही.
अननसाचा रस : अनानसमुळे पोटाची चरबी सहजरित्या कमी करता येते. अननसमुळे चयापचय वाढते, पचन क्रिया वाढते.
cnxoldfiles/em>चॉकलेट शेकच्या सेवनामुळे अतिरिक्त चरबी कमी करता येऊ शकते.