हिवाळ्यात त्वचेवर येणाऱ्या खाजेने हैराण आहात? करा हे ४ घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 11:37 AM2018-12-29T11:37:12+5:302018-12-29T11:39:00+5:30

अनेकांमध्ये डोकं खाजवण्याचं कारण स्वच्छतेची कमतरता, डॅंड्रफ किंवा इन्फेक्शनही असू शकतं. डोक्यासोबतच हिवाळ्यात हात, पाय, मान किंवा शरीरावर खाज येते.

Dry and itchy skin winter special best 4 home remedies | हिवाळ्यात त्वचेवर येणाऱ्या खाजेने हैराण आहात? करा हे ४ घरगुती उपाय

हिवाळ्यात त्वचेवर येणाऱ्या खाजेने हैराण आहात? करा हे ४ घरगुती उपाय

googlenewsNext

हिवाळ्यात त्वचेवर खाज येणे ही एक सामान्य बाब आहे. ही समस्या त्वचा कोरडी झाल्यामुळे होते. पण अनेकांमध्ये डोकं खाजवण्याचं कारण स्वच्छतेची कमतरता, डॅंड्रफ किंवा इन्फेक्शनही असू शकतं. डोक्यासोबतच हिवाळ्यात हात, पाय, मान किंवा शरीरावर खाज येते. एकदा खाजवल्यावर आराम तर मिळतो, पण नंतर त्या जागेवर जास्त खाज येऊ लागते आणि त्याची जखम तयार होते. कधी कधी इन्फेक्शन होण्याचाही धोका असतो. पण शरीराच्या वेगवेगळ्या भागात एकत्र खाज येत असेल तर ही समस्या दूर करणे जरा कठीण असतं. पण काही खास उपाय केले तर खाज दूर केली जाऊ शकते. 

सरसूचं तेल

हिवाळ्यात खाज येण्याचं  मुख्य कारण त्वचा कोरडी होणे हे आहे. आणि हा त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी सरसूचं तेल चांगला पर्याय आहे. फार पूर्वीपासून आपले पूर्वज आंघोळ करण्याआधी शरीराला सरसूचं तेल लावत असत. याने त्वचा मुलायम होत असे. सरसूच्या तेल त्वचेच्या आत गेल्यावर त्याने त्वचेला पोषण मिळतं आणि त्वचा मुलायम होते. खाजवणे दूर करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. 

कडूलिंब

कडूलिंबाला त्वचेसाठी गोड मानलं जातं. कडूलिंब हा त्वचेसाठी फार फायदेशीर असतो. कारण या झाडाच्या पानांमध्ये अॅंटीसेप्टिक आणि अॅंटी बायोटिक गुण असतात. जे खाज दूर करण्यासाठी फायदेशीर असतात. यासाठी कडूलिंबाची पाने पाण्यात उकळून घ्या आणि हे पाणी कोमट झाल्यावर त्याने आंघोळ करा. किंवा ही पाने बारीक करुन दह्यासोबत खाज येणाऱ्या जागेवर लावून ठेवा. यानेही खाज दूर होते.

लिंबू

खाज दूर कऱण्यासाठी सर्वाच चांगला घरगुती उपाय म्हणजे लिंबू. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लिंबू घरात सहज मिळतं. लिंबामध्ये अॅसिडिक आणि सिट्रिक अॅसिड असतं. याने खाजवण्याची समस्या दूर करण्यास मदत मिळते. हा उपाय गेल्या अनेक वर्षांपासून वापरला जातो. हा उपाय करण्यासाठी लिंबाचा रस पाण्यात टाका आणि खाज येणाऱ्या जागेवर लावा. याने थोडं जळजळ होईल. तसेच दोन चमचे तुळशीच्या पानांचा रस आणि दोन चमचे लिंबाचा रस मिश्रित करुन खाज येत असलेल्या जागेवर लावा. याने खाज दूर होईल. 

झेंडूच्या झाडाची पाने 

झेंडूच्या झाडाच्या पानांमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी वायरल आणि अॅंटी फंगल गुण असतात. याने तुमची खाजवण्याची समस्या दूर होते. यासाठी तुम्हाला झेंडूच्या झाडाची काही पाने पाण्यात टाकून उकळून घ्या. नंतर हे पाणी खाज येत असलेल्या जागेवर लावा. जर हा उपाय ७ दिवस केला गेला तर तुमची समस्या दूर होईल.
 

Web Title: Dry and itchy skin winter special best 4 home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.