ड्राय ब्रशिंगचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? त्वचेला होतात 'हे' फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 12:25 PM2019-01-02T12:25:13+5:302019-01-02T12:30:54+5:30
ड्राय ब्रशिंग आजही जगातल्या सर्वात लोकप्रिय ब्यूटी ट्रेन्ड्सपैकी एक आहे. मॉडल्सपासून ते स्कीनकेअरबाबत उत्साही लोकांपर्यंत अनेकांनी या क्रियेच्या लाभांबाबत सांगितलं आहे.
ड्राय ब्रशिंग आजही जगातल्या सर्वात लोकप्रिय ब्यूटी ट्रेन्ड्सपैकी एक आहे. मॉडल्सपासून ते स्कीनकेअरबाबत उत्साही लोकांपर्यंत अनेकांनी या क्रियेच्या लाभांबाबत सांगितलं आहे. ही क्रिया फार प्रभावशाली आणि त्वचेत फार सुधारणा करत असल्याने अनेक महिलांमध्ये लोकप्रिय झाली आहे. चला जाणून घेऊ ड्राय ब्रशिंगचे फायदे...
काय आहेत फायदे?
आज आम्ही तुम्हाला ड्राय ब्रशिंगने त्वचेला होणाऱ्या फायद्यांबाबत सांगणार आहोत. तुम्ही तुमच्या त्वचेचा पोत आणि रंग सुधारण्यासाठी ड्राय ब्रशिंग करु शकता. त्यासोबतच ही क्रिया एखाद्या स्पा ट्रीटमेंटसारखीच आहे. तसेच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्वस्तही आहे. याचा वापर तुम्ही सहजपणे आंघोळीआधी करु शकता. कारण ब्रश त्वचा ब्रश करायला साधारण १० ते १५ मिनिटांचा कालावधी लागतो.
(Image Credit : charlottesbook.com)
डेड स्कीन दूर करण्यासाठी
एक्सपोलिएशन म्हणजे मृत पेशी दूर करण्यासाठी ड्राय ब्रशिंग एक महत्वपूर्ण उपाय आहे. याने त्वचा स्वच्छ राहते आणि संक्रमण होण्यापासूनही वाचते. त्वचेवरील मृत पेशी दूर न केल्याने त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. तसेच ड्राय ब्रशिंग एक अशी विधी आहे जी त्वचेच्या रोमछिद्रांमधील मृत पेशी, धूळ-माती, अतिरिक्त तेल आणि विषारी पदार्थ बाहेर करण्यास मदत करते. याने तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल.
त्वचा चमकदार करण्यासाठी
अनेकांसाठी रफ आणि डल त्वचा शरमेची बाब झाली आहे. इतकेच नाही तर यामुळे वेगवेगळे कॉस्मेटिक प्रॉडक्ट वापरण्यासही लोक तयार होतात. पण हे न वापरताही कोमट पाण्याने आंघोळ करुन तुम्ही सुस्त त्वचा चांगली होऊ शकते. तसेच यात ड्राय ब्रशिंगची मदत घेतली तर आणखी फायदा होऊ शकतो.
नको असलेले केस दूर करा
अनावश्यक केस ही अनेकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. महिलांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते. त्यांच्या हातांवर आणि पायांवर भरपूर केस येतात. अशात अनेक महिला हे केस शेविंग करुन दूर करतात. पण याने समस्या दूर होण्याऐवजी पुढे वाढते. पण जर तुम्ही ड्राय ब्रशिंगचा वापर केला तर प्रभावीपणे हे केस दूर करण्यास मदत होऊ शकते. यासाठी त्वचेला ब्रश करण्याची योग्य पद्धत जाणून घेणे आवश्यक आहे.
कसा कराल वापर?
- आंघोळ करण्याआधी ब्रशने हळूहळू पायांवर घासा.
- हा ब्रशी तुम्ही सर्कुलर मोशनमध्ये फिरवत रहा.
- शरीराच्या इतर भागांवरही तुम्ही ब्रश फिरवू शकता.
- संवेदनशील अंगांवर ब्रश फिरवताना काळजी घ्या.
- नंतर गरम पाण्याने आंघोळ करा.
या गोष्टींचीही घ्या काळजी
-ब्रशिंगसाठी नेहमी सॉफ्ट ब्रशचा वापर करावा.
- जर ब्रशने कोणत्याही प्रकारचे रॅशेज, जखम झाली असेल तर ब्रशिंग करुन नये.
- रॅशेज आणि संक्रमण झालं असेल तर ब्रशिंगने संक्रमण संपूर्ण शरीरावर पसरु शकतं.
-कधीही ब्रश पाण्यात भिजवू नका. नेहमी कोरड्या ब्रशचा वापर करा.
-ब्रश किमान आठवड्यातून एकदा पाणी किंवा साबणाने स्वच्छ करा. ब्रश धुतल्यानंतर तो हवेशीर ठेवा. चांगल्याप्रकारे कोरडा झाल्यावरच त्याचा वापर करा.
-ब्रशिंग करताना त्वचेवर जास्त दबाव टाकू नका. हळूहळू त्वचेवर ब्रशिंग करा. जर तुम्ही जास्त जोर लावला तर त्वचेवर खाज किंवा रेडनेस येण्याची शक्यता असते.