ड्राय स्किनवर मेकअप करण्यासाठी 'या' टिप्स वापरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 05:43 PM2018-11-15T17:43:58+5:302018-11-15T17:44:58+5:30

प्रत्येकजण आपलं सौंदर्य जपण्यासाठी कसोशिने प्रयत्न करत असतं. सौंदर्यात आणखी भर पाडण्यासाठी मेकअपचा आधार घेण्यात येतो. परंतु योग्य मेकअप केला तरच आपल्या सौंदर्यामध्ये आणखी भर पडते.

dry skin makeup tips on winters | ड्राय स्किनवर मेकअप करण्यासाठी 'या' टिप्स वापरा!

ड्राय स्किनवर मेकअप करण्यासाठी 'या' टिप्स वापरा!

Next

प्रत्येकजण आपलं सौंदर्य जपण्यासाठी कसोशिने प्रयत्न करत असतं. सौंदर्यात आणखी भर पाडण्यासाठी मेकअपचा आधार घेण्यात येतो. परंतु योग्य मेकअप केला तरच आपल्या सौंदर्यामध्ये आणखी भर पडते. त्यासाठी आपला स्किन टाइप ओळखून मेकअप करणं गरजेचं असतं. तुमची स्किन ड्राय असेल तर मेकअप प्रोडक्ट निवडताना काळजी घेणं गरजेचं असतं. स्किन टाइपनुसार मेकअप प्रोडक्ट्सची निवड केल्याने सौंदर्यात आणखी भर पडते. तुम्हाला एक वेगळाच लूक मिळतो. मेकअप करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो केल्या तर त्याचा फायदा होईल. 

ड्राय स्किनवर मेकअप करण्यासाठी या टिप्स फॉलो करा : 

1. अशी करा सुरुवात 

स्किन कोणत्याही प्रकारची असो परंतु मेकअपची सुरुवात करण्याआधी त्या स्किन टाइपनुसार फेसवॉश निवडा आणि त्याने चेहरा स्वच्छ करा. जर तुमची स्किन डल झाली तर मेकअप केल्यानंतर लूकही डल दिसेल. त्यानंतर स्किनचा ड्रायनेस कमी करण्यासाठी योग्य त्या मॉयश्चरायझरचा वापर करा. 

तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही मॉयश्चरायझरऐवजी स्किन सीरमचाही वापर करू शकता. त्यानंतर मेकअपचा बेस लावण्याआधी प्राइमर किंवा फाउंडेशनचा वापर करा. बाजारामध्ये अनेक प्रकारचे फाउंडेशन उपलब्ध आहेत. परंतु, कोरडी त्वचा असलेल्या महिलांनी शक्यतो क्रिम बेस्ड फाउंडेशनचा वापर करा. 

2. लिपस्टिकचा वापर 

लिपस्टिकशिवाय मेकअप पूर्ण होत नाही. सुकलेल्या ओठांवर जर लिपस्टिक लावली तर त्यामुळे लूक खराब होतो. अशातच जर आधी लिप प्राइमर किंवा लिप बामचा वापर करणं फायदेशीर ठरतं.  

तुमच्या ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी त्यावर लिप बाम लावा. त्यानंतर लिपस्टिकचा वापर करा. ड्राय लिप्सवर क्रिमी लिपस्टिकचाच वापर करा. परंतु मॅट लिपस्टिकचा वापर अजिबात करू नका. 

3. हायड्रेटिंग स्प्रे 

साधारणतः मेकअप पूर्ण झाल्यानंतर सेटिंग स्प्रेचा वापर करण्यात येतो. ज्यामुळे मेकअप खूप वेळ टिकतो. परंतु ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांनी सेटिंग स्प्रेऐवजी हायड्रेटिंग स्प्रेचा वापर करणं फायदेशीर ठरतं. 

या स्प्रेची खासियत म्हणजे मेकअपच्या आधी किंवा नंतर सहज वापर केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त तीन-चार तासांनंतर जेव्हाही स्किन ड्राय वाटेल तेव्हा स्किनला मॉयश्चराइझ करण्यासाठी हायड्रेटिंग स्प्रेचा वापर करा. 

या गोष्टी लक्षात ठेवा :

1. मेकअपशिवाय डेली रूटीनमध्ये अशा प्रोडक्ट्सचा वापर करा जे कोरड्या त्वचेसाठी योग्य ठरतील. 

2. ड्राय स्किनला एक्सफोलिएट करणं अजिबात विसरू नका. त्यामुळे डेड स्किन सेल्स दूर होतात आणि स्किनवर ग्लो येण्यास मदत होते. 

3. ड्राय स्किन असल्यास मेकअप करताना पावडर लावणं शक्य तो टाळा. मग गोष्ट ब्लशरची असो किंवा फाउंडेशनची. क्रिम बेस्ड प्रोडक्टचा वापर करणं फायदेशीर ठरेल. पावडर बेस्ड प्रोडक्टमुळे स्किनवरील ड्रायनेस आणखी वाढतो. 

Web Title: dry skin makeup tips on winters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.