​सिगारेट सोडल्यामुळे दारूचे व्यसन होते कमी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2016 05:39 PM2016-07-22T17:39:36+5:302016-07-22T23:18:54+5:30

ज्या लोकांनी अलिकडेच सिगारेट सोडली आहे ते धुम्रपान करणार्‍या लोकांपेक्षा कमी दारू पिण्याची शक्यता असते.

Due to the cigarette quit alcohol addiction? | ​सिगारेट सोडल्यामुळे दारूचे व्यसन होते कमी?

​सिगारेट सोडल्यामुळे दारूचे व्यसन होते कमी?

Next
म्रपानाचे व्यसन सुटणे बर्‍याच जणांना खूप अवघड वाटते. पण सिगारेट सोडण्यासाठी आणखी एक कारण समोर आले आहे. नव्या संशोधनानुसार ज्या लोकांनी अलिकडेच सिगारेट सोडली आहे ते धुम्रपान करणार्‍या लोकांपेक्षा कमी दारू पिण्याची शक्यता असते.

इंग्लंडमध्ये ज्यांनी मागच्या आठवड्यात सिगारेट सोडली त्यांनी कमी प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केले असल्याचे दिसून आले. त्यांची गणना ‘लाईट ड्रिंकर्स’ अशी केली गेली. सिगारेट सोडल्यामुळे येणार्‍या अस्वस्थेतेमुळे दारू पिण्याची इच्छा वाढते अशा प्रचलित समज खोडून काढणारे हे निष्कर्ष आहेत.

यापूर्वी झालेल्या संशोधनातून अल्कोहोल सेवन आणि तंबाखूची तलप यांचा घनिष्ठ संबंध असतो हे सिद्ध झालेले आहे. युनिव्हर्र्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी केलेल्या या सर्वेक्षणात एकूण ३१,८७८ लोकांनी सहभाग घेतला. त्यांपैकी ६२८७ लोकांनी मार्च २०१४ ते सप्टेंबर २०१५ दरम्यान धुम्रपान केल्याचे मान्य केले.

या धुम्रपान करणार्‍या लोकांपैकी १४४ लोकांनी गेल्या आठवड्यात सर्वेक्षणापूर्वी सिगारेट सोडण्याचा प्रयत्न सुरू केला होता. अध्ययनाअंती या लोकांमध्ये अल्कोहोल घेण्याचे प्रमाण कमी आढळून आले. ‘धुम्रपान करणार्‍या लोकांना बहुधा दारूपिल्यामुळे सिगारेटची सवय पुन्हा सुरू होईल या अशी भीती वाटत असावी. म्हणून ते शक्य तितके दारू पिण्याचे टाळतात’, अशी माहिती संशोधनप्रमुख जेमी ब्राऊन यांनी दिली.

Web Title: Due to the cigarette quit alcohol addiction?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.