तुमचा रंग सावळा असेल तर आनंदाची बातमी, नाही होणार 'हा' आजार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 11:17 AM2018-08-10T11:17:07+5:302018-08-10T11:17:50+5:30

अनेकांना आपला रंग सावळा असणं पसंत नसतं. त्यामुळे ते चेहरा उजळवण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात. पण सावळा रंग असणं वाईट नाहीये.

Dusky colour Asian women are the least likely to be diagnosed with dementia says study | तुमचा रंग सावळा असेल तर आनंदाची बातमी, नाही होणार 'हा' आजार!

तुमचा रंग सावळा असेल तर आनंदाची बातमी, नाही होणार 'हा' आजार!

अनेकांना आपला रंग सावळा असणं पसंत नसतं. त्यामुळे ते चेहरा उजळवण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात. पण सावळा रंग असणं वाईट नाहीये. ज्या महिलांचा रंग सावळा असतो त्या महिलांना ही माहीत वाचून नक्कीच आनंद होईल. कारण नुकत्याच करण्यात आलेल्या एक अभ्यासानुसार, ज्या महिलांना रंग सावळा असतो त्या महिलांना विसरभोळेपणाची समस्या कमी असते. खासकरुन आशियातील सावळ्या महिलांमध्ये ही समस्या कमी असते. 

काय आहे निष्कर्ष?

द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, या अभ्यासासाठी २५ लाख लोकांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं. त्यानंतर अभ्यासक या निष्कर्षावर पोहोचले आहेत. हा अभ्यास सुनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या अभ्यासकांनी केलाय. यात असे सांगण्यात आले आहे की, इतर लोकांच्या तुलनेत सावळ्या रंगाच्या लोकांमध्ये डिमेंशिया (विसरण्याचा आजार) होण्याची शक्यता कमी असते. हा रिपोर्ट एपिडेनियोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलाय.

काय म्हणाले अभ्यासक?

हा अभ्यास साधारण ८ वर्षांपूर्वी सुरु करण्यात आला होता, त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आलाय. या अभ्यासाशी निगडीत तज्ज्ञांचं म्हणनं आहे की, यासाठी जीन्स आणि वातावरण दोन्ही जबाबदार आहेत. डिमेंशिया होण्याची शक्यता आशियाई महिलांमध्ये १८ आणि पुरुषांमध्ये १२ टक्के कमी असते. 

जातीय पार्श्वभूमीवर केलं गेलेलं हे पहिलंच अध्ययन आहे. अभ्यासक डॉक्टर क्लॉडिया कूपर यांनी सांगितले की, ज्या 25,11,681 लोकांना या अभ्यासात सहभागी करुन घेण्यात आले होते त्यातील 66000 लोकांना डिमेंशिया होता. 

आता अभ्यासक चिंतेत आहेत की, एखाद्या खास जातीय समूहाला हा आजार जास्त होण्याची शक्यता अधिक का आहे? डिमेंशिया अनेकप्रकारच्या मानसिक विकारांचा समूह आहे. हा धुम्रपान, व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य यांसारख्या कारणांमुळेही होतो. 

Web Title: Dusky colour Asian women are the least likely to be diagnosed with dementia says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.