या उपायांनी केस गळणं होईल कायमचं दूर, एकदा करून तर बघाच....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 10:01 AM2019-11-25T10:01:44+5:302019-11-25T10:12:30+5:30
सध्याच्या काळात केस गळण्याची समस्या ही जास्त जाणवते.
(Image credit -rd.com)
सध्याच्या काळात केस गळण्याची समस्या ही जास्त जाणवते. त्यामुळे बऱ्याच स्त्रिया या चांगले केस मिळवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. केसांच्या तक्रारी असल्यास त्या दूर करणं हे मोठे कामच होऊन बसतं. अशा वेळी घरगुती उपाय नक्कीच फायद्याचे ठरतात. चटकन करता येणारे हे उपाय तुम्ही केले तर केस गळती थांबेल. बदलती जीवनशैली, अनियमीत आहार, यांमुळे केसांशी निगडीत समस्या वाढत आहे. तर जाणून घ्या केस गळण्याची कारणं आणि उपाय.
(Image credit-be beautifull)
केस गळण्याची कारणं.
बदलती जीवनशैली
पौष्टिक घटकांची कमतरता-
प्रेंग्नेंसीनंतर केस गळणे
तीव्र आजारपणानंतर
ताण-तणाव
अनुवांशिकता
कर्करोगावरील औषधोपचारांमुळे
(Image credit- first cry parenting)
केस गळणं रोखण्यासाठी काही खास टीप्स -
१) कांदा
कांदा हा केसांसाठी फायदेशीर असतो. कांद्याला मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घेऊन वाटावा. त्यानंतर कांद्याचा रस काढून घ्यावा. हा रस केसांना लावावा. तीन मिनिट हा रस ठेवून द्यावा. त्यानंतर चांगल्या शॅम्पूने केस धुवून टाकावेत. कांद्याचा रस आठवड्यातून तीनवेळा लावणे आवश्यक आहे. असे केल्याने केसांची वाढ चांगली होते.
२) मेथी
मेथी दाणे पाण्यात टाकून ते पाणी उकळा. आता हे पाणी एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या. या पाण्यात तुम्ही कांद्याचा रसही टाकू शकता. हे पाणी केसांच्या मुळाशी स्प्रे करा. हे मिश्रण एक तास केसांना लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवा.
३) आवळा-
केस गळतीने त्रस्त असलेल्यांसाठी आवळा नक्कीच फायदेशीर ठरतो. त्यातील व्हिटामिन सी व अॅन्टीऑक्सिडन्ट गुण यांमुळे केस गळती थांबवते. आवळ्याचा अर्क अथवा पावडर लिंबाच्या रसात एकत्र करा. हे मिश्रण केसांना लावून सुकू द्या. केस कोमट पाण्याने धुऊन टाका.
४) केळी आणि लिंबू -
एक केळ्यात लिंबूचा रस मिक्स करून ते एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्या. ती डोक्याला लावा. केस गळण्याची समस्या दूर होईल. असे केल्यास केस वेगाने वाढतात.
५) खोबऱ्याचं तेल-
केसांच्या मुळांना तेल लावल्याने केसांच्या वाढीसाठी आवश्यक ती पोषक घटक मिळतात. त्यामुळे केस लांब आणि मजबूत राहतात. केसांना कोमट तेल लावल्यानंतर केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज करा. तेल लावल्यानंतर टॉवेल गरम पाण्यात टाकून तो पिळून केसांना बांधतात. असे १० मिनिटांसाठी केल्यास केसांमध्ये तेल योग्य पद्धतीने मुरण्यास मदत होते. दोन तासांनी केस शॅम्पूने धुवून टाका. ह्या पद्धतीने तेल लावल्यामुळे रक्तप्रवाह चांगला होण्यासही मदत होते.