आता घरीच करा स्वस्तात मस्त बॉडी पॉलिशिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 12:14 PM2018-10-08T12:14:14+5:302018-10-08T12:19:19+5:30

सुंदर दिसण्यासाठी अनेक तरूणी पार्लरमध्ये तासंतास घालवताना दिसतात. त्यासाठी फेशिअल, पेडिक्योर किंवा इतर ब्यूटी ट्रिटमेंट करण्यात येतात. यातीलच एक ट्रिटमेंट म्हणजे आहे बॉडी पॉलिशिंग.

easily do at home body polishing in just 5 steps | आता घरीच करा स्वस्तात मस्त बॉडी पॉलिशिंग!

आता घरीच करा स्वस्तात मस्त बॉडी पॉलिशिंग!

googlenewsNext

सुंदर दिसण्यासाठी अनेक तरूणी पार्लरमध्ये तासंतास घालवताना दिसतात. त्यासाठी फेशिअल, पेडिक्योर किंवा इतर ब्यूटी ट्रिटमेंट करण्यात येतात. यातीलच एक ट्रिटमेंट म्हणजे आहे बॉडी पॉलिशिंग. बॉडि पॉलिशिंगमार्फत संपूर्ण शरीर एक्सफोलिएट आणि मॉयश्चरायझ्ड करण्यात येतं. यामुळे सूर्याच्या किरणांमुळे झालेली स्किनची हानी आणि डिहायड्रेट झालेली स्किन निघून जाण्यास मदत होते. त्याचप्रमाणे बॉडी पॉलिशिंगमुळे शरीरावरील डेड स्किन निघून जाण्यासही मदत होते आणि शरीरामध्ये नवीन सेल्स तयार करण्यास मदत करते. परंतु यासाठी तुम्हाला सतत पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. तसेच पार्लरमध्ये जाऊन बॉडी पॉलिशिंग करणं हे खर्चिकही असतं. 

पार्लरमध्ये बॉडी पॉलिशिंग करताना अनेक केमिकल्स असलेल्या प्रोडक्ट्सचा वापर करण्यात येतो. त्यामुळे शरीराला अॅलर्जी किंवा इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते. कारण प्रत्येक प्रोडक्ट आपल्या स्किनला सुट होईलच असे नाही. तसेच यामध्ये असलेल्या केमिकल्समुळे अनेक साईडइफेक्ट्सही होण्याची शक्यता असते. तुम्ही घरच्या घरीही बॉडी पॉलिशिंग करू शकता. जाणून घेऊयात घरच्या घरी बॉडी पॉलिशिंग करण्याच्या पद्धतीबाबत...

घरच्या घरी बॉडी पॉलिशिंगसाठी आवश्यक असणारं साहित्य - 

  • घरी तयार करण्यात आलेलं बॉडी स्क्रब
  • प्यूमिक स्टोन
  • ऑलिव्ह ऑईल
  •  

घरी असं करा बॉडी पॉलिशिंग - 

स्टेप 1 :

बॉडी पॉलिशिंग करण्यास सुरुवात करताना सर्वात आधी कोमट पाण्याने आंघोळ करून घ्या. शक्य असल्यास तुम्ही एक टॉवेल गरम पाण्यामध्ये ओला करून त्याने संपूर्ण शरीर स्वच्छ करून घेऊ शकता. 

स्टेप 2 :

ऑलिव्ह ऑईल थोडं गरम करून त्याने संपूर्ण शरीराचा मसाज करा. मसाज केल्यानंतर 5 ते 10 मिनिटं ते तसचं शरीरावर ठेवा. त्यानंतर बॉडी नीट स्वच्छ करून घ्या. त्यामुळे स्किन मॉयश्चराइझ होण्यास मदत होईल आणि स्किन चमकदार होईल. 

स्टेप 3 :

आता घरी तयार केलेल्या स्क्रबने संपूर्ण बॉडिला पॉलिशिंग करा. त्यासाठी तुम्ही घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साखर आणि मधाचा वापर करू शकता. यामुळे शरीरावरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होईल. त्यानंतर हार्ड स्किन म्हणजेच पायाच्या टाचा, हाताचे कोपरे आणि मान प्यूमिक स्टोनच्या मदतीने स्वच्छ करा. 

स्टेप 4 :

संपूर्ण बॉडिवर चांगल्या प्रकारे स्क्रबिंग केल्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करा. 

स्टेप 5 :

आंघोळ केल्यानंतर संपूर्ण बॉडीला मायश्चरायझर लावा. ज्यामुळे स्किन तजेलदार होण्यास मदत होईल. 

किती वेळा कराल बॉडी पलिशिंग?

जर तुम्ही सतत प्रवास करत असाल किंवा उन्हामध्ये फिरत असाल तर महिन्यातून 2 ते 3 वेळा बॉडि पॉलिशिंग करणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: easily do at home body polishing in just 5 steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.