लव्ह बाइट चारचौघात चर्चेचा विषय ठरू नये असं वाटत असेल, तर वापरा 'या' खास टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 12:28 PM2020-01-28T12:28:29+5:302020-01-28T12:33:44+5:30

तुमच्या बेडरूमधील गोष्टी मित्र-मैत्रिणींमध्ये चर्चेचा विषय ठरू नये, असा प्रयत्न सगळेजण करत असतात. पण पॅशन तर कंट्रोल न होणारी गोष्ट असते.

Easy makeup tips to hide love bite marks | लव्ह बाइट चारचौघात चर्चेचा विषय ठरू नये असं वाटत असेल, तर वापरा 'या' खास टिप्स!

लव्ह बाइट चारचौघात चर्चेचा विषय ठरू नये असं वाटत असेल, तर वापरा 'या' खास टिप्स!

Next

(Image Credit : healthline.com)

तुमच्या बेडरूमधील गोष्टी मित्र-मैत्रिणींमध्ये चर्चेचा विषय ठरू नये, असा प्रयत्न सगळेजण करत असतात. पण पॅशन तर कंट्रोल न होणारी गोष्ट असते. या पॅशनमुळे अनेकदा अनेकांना त्यांच्या लव्ह बाईट्समुळे चारचौघात लाजिरवाण्या क्षणांचा सामना रावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला हे लव्ह बाईट्स गायब करण्याच्या काही ब्युटी टिप्स सांगणार आहोत.

मेकअप

(Image Credit : healthline.com)

जर तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं असेल किंवा पार्टिला जायचं असेल तर मानेवर किंवा मानेच्या खाली असलेल्या लव्ह बाइटमुळे अनेकदा पंचाईत होते. अशात हे निशाण मिटवण्यासाठी मेकअप कामी येऊ शकतं. तुमच्या मेकअफ किटमधील कन्सीलर आणि फेस पावडर तुमच्या बरंच कामी येऊ शकतं. कन्सीलरच्या मदतीने तुम्ही लव्ह बाईट लपवू शकता आणि फेस पावडरनेही करू शकता. 

दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी

(Image Credit : stylecraze.com)

जेव्हा लव्ह बाइटचं निशाण मिटू लागेल तेव्हा आधीपेक्षा त्याचा रंग बदलू लागेल. आता हा रंग हलका लाल किंवा हिरवा दिसू शकतो. अशात तुम्ही कन्सीलरचा वापर केल्यावर तुमच्या स्कीन टोनपेक्षा एक शेड डार्क फेस पावडर वापरा. याने तुम्हाला लव्ह बाइट लपवण्यास मदत मिळेल. 

डार्क मेकअप

(Image Credit : hindi.lifeberrys.com)

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जर तुमच्या चेहऱ्यावर किंवा मानेवर लव्ह बाइट असेल तर डार्क मेकअपचा वापर करू शकता. तसेच लव्ह बाइटवरून लक्ष हटवण्यासाठी तुम्ही डार्क किंवा ब्राइट कलरचं लिपस्टिक वापरू शकता.  

केस मोकळे ठेवा

(Image Credit : YouTube)

मोकळे केस तर सगळ्यांनाच चांगले वाटतात. पण मानेवरील किंवा कानावरील लव्ह बाइट लपवण्यासाठी तुम्ही मुद्दाम केस मोकळे ठेवू शकता. कन्सीलर आणि फेस पावडर लावल्यावरही तुम्ही केस मोकळे ठेवू शकता.  

आइस क्यूबची मदत

(Image Credit : Social Media)

जर लव्ह बाइट फारच डार्क असेल तर तुम्ही आइस क्यूब कापडामध्ये गुंडाळून त्यावर फिरवू शकता. नंतर त्यावर लोशल किंवा मेकअप प्रायमर लावू शकता. 


Web Title: Easy makeup tips to hide love bite marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.