नाकातील वाढलेल्या केसांना वैतागलात? या उपयांनी करा केस दूर...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 11:44 AM2019-11-22T11:44:10+5:302019-11-22T11:50:53+5:30
नाकातील केस नाकाच्या मार्गे शरीरात जाणारी धूळ आणि घाण रोखतात. पण नाकातील हे केस अधिक वाढल्याने अनेकांना लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो.
(Image Credit : baldingbeards.com)
नाकातील केस नाकाच्या मार्गे शरीरात जाणारी धूळ आणि घाण रोखतात. पण नाकातील हे केस अधिक वाढल्याने अनेकांना लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो. हे केस दिसायलाही जरा विचित्र वाटतं आणि त्यांच्यामुळे होणारी नाकाची वळवळही कंटाळवाणी असते. त्यामुळे अनेकजण वेगवेगळे उपाय शोधत असतात. पण तरीही काही फायदा होतांना दिसत नाही. अशात काही खास उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
नाकात वळवळ
(Image Credit : economictimes.indiatimes.com)
तसे तर नाकातील केस आपल्या चांगल्या आरोग्यासाठी फारच फायद्याचे असतात. हे केस हवेतील धुळ, माती फुफ्फुसांमध्ये जाण्यापासून रोखतात. पण जेव्हा हे केस वाढतात तेव्हा ते नाकापुड्यांमधून बाहेर यायला लागतात. हे दिसायला फारच घाणेरडं वाटतं. सोबतच चार लोकांमध्ये लाजिरवाण्या क्षणांचाही सामना करावा लागतो. पुरुषांना या समस्येचा अधिक सामना करावा लागतो. हे केस वाढले की, नाकातही सतत वळवळ होत राहते. त्यामुळे हे केस दूर करावे लागतात.
ट्रिमर किंवा कात्री
(Image Credit : theidleman.com)
बाजारात अनेक प्रकारचे ट्रिमर उपलब्ध आहेत. ज्यांच्या माध्यमातून नाकातील केस काढण्यास मदत होते. यांच्या माध्यमातून तुम्ही सहज नाकातील केस काढू शकता किंवा ट्रिम करु शकता. त्यासोबतच नाकातून बाहेर आलेले केस छोट्या कात्रीच्या माध्यमातूनही कापू शकता.
वॅक्सिंग किंवा नोज क्रिम
(Image Credit : fashionmagazine.com)
अनेक स्पा किंवा मेन्स पार्लरमध्ये अलिकडे नोज वॅक्सिंग केली जाते. यासाठी काही एक्सपर्ट नेमलेले असतात. त्यासोबतच हेअर रिमूव्हल क्रिमचाही वापर केला जातो.
इलेक्ट्रिक शेवर अटॅचमेंट
(Image Credit : t3.com)
अलिकडे बाजारात नाकातील केस ट्रिम करण्यासाठी इलेक्ट्रिक शेवर अटॅचमेंट बाजारात मिळत आहेत. या उपकरणाच्या माध्यमातून पुरुष शेव्हिंग, नाकातील केस साफ करु शकतात.
लेजर ट्रिटमेंट
(Image Credit : amarujala.com)
लेजरच्या माध्यमातून नाकातील अतिरिक्त केस नेहमीसाठी काढता येतात. पण हे केवळ एखाद्या एक्सपर्टच्या सल्ल्यानेच करायला हवे.