​केळी खा, अंधत्व टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2016 01:53 PM2016-04-24T13:53:49+5:302016-04-24T19:23:49+5:30

दररोज एक केळी खाण्यामुळे अंध्यत्व टाळता येऊ शकते

Eat banana, avoid blindness | ​केळी खा, अंधत्व टाळा

​केळी खा, अंधत्व टाळा

Next
फरचंदा’चे आरोग्याला किती फायदे आहेत हे तर सर्वांनाचा माहित आहे. परंतु केळीचा नवा लाभ समोर आला आहे. दररोज एक केळी खाण्यामुळे अंध्यत्व टाळता येऊ शकते असे एका स्टडीमध्ये दिसून आले आहे.

दृष्टीसंबंधी विविध आजार टाळण्यासाठी त्यामुळे रोजच्या रोज एक केळी खाणे गरजेचे आहे. संशोधकांना केळीमध्ये कॅरोटेनॉईड हे संयुग सापडले आहे. या संयुगामुळेच भाज्या आणि फळांना लाल, नारंगी आणि पिवळा रंग प्राप्त होतो.

तसेच  आपल्या यकृतामध्ये कॅरोटेनॉईड ‘व्हिटॅमिन-ए’ मध्येसुद्धा कनव्हर्ट होते जे की दृष्टी आरोग्यासाठी फार लाभदायक असते. प्रोव्हिटॅमिन ए कॅरोटेनॉईडने भरपूर असलेली केळी खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन एची कमतरता भरून निघते.

बऱ्याच काळापासून व्हिटॅमिन एची पातळी वाढविण्यासाठी कॅरोटेनॉईडचा कसा उपयोग होऊ शकतो यावार संशोधन चालू होते.

एवढेच नाही तर यापूर्वी झालेल्या रिसर्चमध्ये असे दिसून आले की, कॅरोटेनॉईडचे प्रमाण अधिक असलेल्या भाज्या खाण्यामुळे हृदयविकार, काही प्रकाराचे कॅन्सर आणि मधुमेहालादेखील रोखता येते.

Web Title: Eat banana, avoid blindness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.