डार्क चॉकेलट खा, निवांत झोपा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2016 12:53 PM2016-04-19T12:53:47+5:302016-04-19T18:23:47+5:30
आपल्या शरीराचे घड्याळ सुरळित ठेवण्यासाठी लागणारे अत्यावश्यक घटकपदार्थ चॉक लेटमध्ये असते.
Next
च क लेट प्रेमींसाठी एक खूश खबर आहे. तुम्हाला जर कोणी चॉकलेट खाऊ नका असे सांगितले तर त्यांना सांगा की रात्री शांत झोप लागावी म्हणून चॉकलेट खातोय. नाही कळालं?
अहो एका रिसर्चमध्ये असे दिसून आले की, आपल्या शरीराचे घड्याळ सुरळित ठेवण्यासाठी लागणारे अत्यावश्यक घटकपदार्थ चॉक लेटमध्ये असते. त्यामुळे डार्क चॉकलेट खाणे शांत झोप लागावी म्हणून प्रभावी ठरते.
केंब्रिज विद्यापीठ आणि एडिनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी यावर अभ्यास केला आहे. डार्क चॉकलेट, नट्स, हिरव्या पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियम असते. मॅग्नेशियम आपल्या शरीरात असणाºया पेशींना सिर्काडियन ऱ्हिदमशी एकरुप करण्यास मदत करते. झोपणे, उठणे, तापमान अशा गोष्टीं सिर्काडियन ऱ्हिदमनुसार होत असतात.
प्रमुख संशोधक जर्बेन वॅन ओयेन यांनी माहिती दिली की, सर्व शारीरिक क्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आंतर्गत घड्याळीचे कार्य अतिशय महत्त्वाचे असते. आपले आरोग्य आणि आजारांवर त्याचा थेट परिणाम होत असतो. त्यामुळे बायोलॉजिकल घड्याळीचे संतुलन राखणे खूप गरजेचे असते.
फंगस, एकपेशिय वनस्पती, मानवी पेशी यांचा या संशोधनामध्ये अभ्यास करण्यात आला. मोलिक्युलर विश्लेषणात असे दिसून आले की, 24 तासांच्या सायकलमध्ये मॅग्नेशियम हेलकावे (आॅसिलेट) घेत राहते. दिवसभराच्या पेशींच्या ऊर्जेसाठी हे फार महत्त्वाचे असते.