थंडीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी 'या' फळांचं सेवन करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 04:57 PM2018-10-25T16:57:55+5:302018-10-25T16:59:38+5:30

सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव कमी झाला असून हळूहळू वातावरणात थंडी जाणवू लागली आहे. बदलत्या वातावरणासोबतच आपल्या आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे.

eat these fruits for glowing skin in winter | थंडीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी 'या' फळांचं सेवन करा!

थंडीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी 'या' फळांचं सेवन करा!

Next

(Image Credit : Skin and Hair Academy)

सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव कमी झाला असून हळूहळू वातावरणात थंडी जाणवू लागली आहे. बदलत्या वातावरणासोबतच आपल्या आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. थंडीमध्ये बऱ्याचदा अनेक लोकांना त्वचा कोरडी होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. सध्या बाजारांमध्ये आवळा, पपई आणि डाळिंबांचं सिझन सुरू आहे. ज्यांचा आहारामध्ये समावेश करण्यामुळे तुमची त्वचा तजेलदार बनवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. जाणून घेऊया अशा काही फळांबाबत ज्यांचा आहारात समावेश करणं थंडीमध्ये निर्जिव झालेली त्वचा चमकवण्यासाठी चमकदार करण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

डाळिंब :

डाळिंबातील पोषक तत्व त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्वचेवरील रोम छिद्र स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे चेहऱ्यावर उजाळा येतो आणि तजेलदार दिसतो. 

कीवी :

कीवीमध्ये व्हिटॅमिन-ई आणि अॅन्टी-ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात. त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. 

केळी :

केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असतं. ज्यामुळे कोरडी त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते. त्याचबरोबर व्हिटॅमिन-ई आणि सी मुबलक प्रमाणात असतं. 

अननस : 

अननस हा अॅन्टी-ऑक्सिडंटचा मोठा स्त्रोत आहे. चेहऱ्यावरील अॅक्ने, सुरकुत्या, काळे डाग, ब्लॅकहेड्स यांसारख्या समस्या नाहीसे करण्यासाठी अननसातील पोषक तत्व फायदेशीर ठरतात. 

पपई :

पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि एंजाइमो मोठ्या प्रमाणात आढळतं. आरोग्यासोबतच पपई त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे हे अॅन्टी-ऑक्सिडंट म्हणूनही फायदेशीर ठरतं. हे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतात. थंडीमध्ये त्वचा कोरडी होते अशातच पपई खाल्याने फायदा होतो. 

आवळा :

आयुर्वेदामध्येही आवळ्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. त्याचप्रमाणे त्वचेसाठीही आवळा फायदेशीर ठरतो. रक्त शुद्ध करण्याचं कामही आवळा करतो. त्यामुळे त्वचेवर चमक येते. 

Web Title: eat these fruits for glowing skin in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.