​ब्रेस्ट कॅन्सरवर प्रभावी औषध विकसित!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2016 03:48 PM2016-05-11T15:48:20+5:302016-05-11T21:18:20+5:30

स्तनाच्या कॅन्सरवर प्रभावी औषध उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Effective drug development on breast cancer! | ​ब्रेस्ट कॅन्सरवर प्रभावी औषध विकसित!

​ब्रेस्ट कॅन्सरवर प्रभावी औषध विकसित!

Next
न्सरसारख्या दुर्धर आजारावर परिणामकारक औषधोपचार विकसित करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक काम करत आहेत.

संशोधकांच्या एका गटाला याबाबतील यश प्राप्त झाले असून लवकर स्तनाच्या कॅन्सरवर प्रभावी औषध उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘द स्क्रीप्स रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या (टीएसआरआय) संशोधकांनी असे औषध विकसित केले आहे जे स्तनाच्या कॅन्सरमध्ये गाठी वाढवणाऱ्या उतींची वाढ रोखते.

यामुळे भविष्यात याचा वापर करून औषध निर्माण केले जाऊ शकते. प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांत सर्वात अवघड अशा ट्रीपल निगेटिव्ह स्तन कॅन्सरचे ‘ट्यूमर सेल’ कमी करण्यात हे औषध यशस्वी ठरले.

मॅथ्यू डिस्ने यांनी माहिती दिली की, अशा प्रकारे जेनेटिक सिक्वेन्सला (आनुवांशिक क्रम) वापरून कॅन्सरवर उपचार करण्यासाठी औषध तयार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. याची विशेषत: म्हणजे केवळ कॅन्सर वाढवणाऱ्या पेशींना हे कमी करते.

त्यामुळे कॅन्सरची तीव्रता कमी होण्यास मदत होते. टार्गाप्रायमिर-96 नावाचे संयुग स्तनाच्या कॅन्सरसेल्सला स्वत:हून नष्ट करण्यास भाग पाडते. कॅन्सर निर्माण करणाऱ्या ‘आएनए’वर हे संयुग कार्य करतात. 

Web Title: Effective drug development on breast cancer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.