सतत डोकं खाजवत असल्याने झाले आहात हैराण? करा हे घरगुती उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 11:32 AM2018-06-05T11:32:27+5:302018-06-05T11:32:27+5:30
डोकं खाजवण्याची समस्या अलिकडे अनेकांना त्रासदायक ठरत आहे. डोकं खाजवायला लागलं की, मग कशातही मन लागत नाही आणि कामही होत नाही.
डोकं खाजवण्याची समस्या अलिकडे अनेकांना त्रासदायक ठरत आहे. डोकं खाजवायला लागलं की, मग कशातही मन लागत नाही आणि कामही होत नाही. डोकं खाजवण्याची तशी तर अनेक कारणे असतात. पण केसांच्या तळाशी कोरडेपणा आल्याने ही समस्या अधिक होते.
जर डोक्याच्या त्वचेवरील ड्रायनेसचा वेळेवर उपचार न केल्यास अधिक खाज येऊ शकते. सोबतच केसात कोंडाही होण्याचीही शक्यता असते. आणि जर केसातील कोंड्यावरही वेळेवर उपचार केले नाही तर मायक्रोबियल इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे डोक्याची त्वचा ड्राय राहू देऊ नका. त्यासाठी खालीलप्रमाणे काही घरगुती उपाय करता येतील.
1) टी ट्री ऑईल
जगभरात टी ट्री ऑईलचा वापर लोक आपली सुंदरता वाढवण्यासाठी करतात. यात टरपीन्स नावाचे अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटीफंगल गुण असतात. याचा वापर केल्याने डोक्याची त्वचा चांगली राहते आणि खाजेपासून सुटका मिळू शकते.
कसा कराल वापर?
2 चमचे टी ट्री ऑईल एक चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये मिश्रित करा. कॉटनच्या मदतीने डोक्याच्या त्वचेवर हे मिश्रण लावा. काही दिवस हे केल्यास एका आठवड्यात तुम्हाला फरक दिसेल.
2) अॅलोव्हेरा
हे सगळ्यांनाच माहीत आहे की, अॅलोव्हेराचे किती आरोग्यदायी फायदे आहेत. त्यासोबतच अॅलोव्हेराचा उपयोग केसांना सुंदर, मजबूत आणि कोंडा दूर करण्यासाठीही केला जातो. अॅलोव्हेरा जेल डोक्याच्या त्वचेवर लावल्यास आणि 15 मिनिटांनी शॅम्पू केस धुतल्यास डोक्यातील खाजेतील समस्या दूर होते.
3) अॅप्पल व्हेनेगर
अॅप्पल व्हेनेगरचा उपयोग केसातील घाण स्वच्छ करण्यासाठी अनेक वर्षांपासून केला जातोय. पाण्यात अॅप्पल व्हेनेगर मिश्रित करुन केसांची मसाज केली तर डोक्यातील खाज दूर होते.
4) लिंबू आणि मध
लिंबूमध्ये सुद्धा अॅंटी बॅक्टेरिअल, अॅंटीफंगल गुण मोठ्या प्रमाणात असतात. डोक्यातील खाज दूर करण्यासाठी लिंबाच्या रसात मध मिश्रित करुन केसांची मसाज करा. 15 मिनिटांनी केस धुवा. याने तुम्हाला आराम मिळेल.