त्वचेसाठी लाभदायक ठरतं इसेन्शिअल ऑइल; जाणून घ्या फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:56 PM2018-12-04T17:56:59+5:302018-12-04T17:57:52+5:30
त्वचेचं सौंदर्य राखण्यासाठी आणि तारूण्य टिकवण्यासाठी लोकं अनेक प्रकारचे न्यूट्रिएंट्स आणि ऑइल्सचा वपर करतात. अशातच काही आवश्यक तेल म्हणजेच इसेन्शिअल ऑइल (Essential Oils) जे आपल्या त्वचेचं सौंदर्य जपण्यासाठी मदत करतात.
त्वचेचं सौंदर्य राखण्यासाठी आणि तारूण्य टिकवण्यासाठी लोकं अनेक प्रकारचे न्यूट्रिएंट्स आणि ऑइल्सचा वपर करतात. अशातच काही आवश्यक तेल म्हणजेच इसेन्शिअल ऑइल (Essential Oils) जे आपल्या त्वचेचं सौंदर्य जपण्यासाठी मदत करतात. तसेच त्यांचा उपयोग अनेक आजारांपासून सुटका करण्यासाठी देखील करण्यात येतो. बाजारात विविध प्रकारचे इसेन्शिअल ऑइल उपलब्ध आहेत. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य त्या इसेन्शिअल ऑइलची निवड करून त्याचा वापर करू शकता.
रोजमॅरी ऑइल
रोजमॅरी ऑइल एक ऊर्जावर्धक तेल आहे. या तेलाचा वापर केल्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे एकाग्रता वाढविण्यासाठीही हे ऑइल फायदेशीर ठरते. या तेलामध्ये आयर्न, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन बी-6 मुबलक प्रमाणात असतं.
जरेनियम ऑइल
जरेनियम ऑइल एक वर्सटाइल ऑइल आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्वचेवर जमा होणार तेल बॅलेन्स करण्यासाठी हे ऑइल फायदेशीर ठरतं. त्यामुळे ऑइली स्किनच्या समस्येपासून सुटका होण्यास मदत होते. हे प्रत्येक स्किन टाइपसाठी फायदेशीर ठरते.
यलंग-यालंग ऑइल (YLANG YLANG )
ऑयली स्किन आणि पिंपल्स असलेल्या स्किनमध्ये यलंग-यालंग फायदेशीर ठरतं. हे एक अॅन्टी-एजिंग ऑइल आहे. त्वचेवर जमा होणार तेल बॅलेन्स करण्यासाठी हे ऑइल फायदेशीर ठरतं.
लेमनग्रास ऑइल
चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग दूर करणं फार कठिण काम. अनेक उत्पादनं आणि ट्रिटमेंट फॉलो केल्यानंतरही हे डाग जात नाहीत. अशातच लेमनग्रास ऑइल डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. याचा वापर स्किन टोनर म्हणूनही करू शकता.
लेव्हेंडर ऑइल
अरोमाथेरपीमध्ये लेव्हेंडर ऑइलचा वापर करण्यात येतो. यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. तर यामधील अॅन्टीसेप्टिक गुणधर्मांमुळे भाजल्यावरही याचा वापर करण्यात येतो.
टी ट्री ऑइल
टी ट्री ऑइल त्वचेसाठी लाभदायक ठरतं. यामध्ये अॅन्टीफंगल आणि अॅन्टीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. जर तुम्हाला पिंपल्स आणि ऑयली स्किनपासून सुटका करून घ्यायची असेल तर टी ट्री ऑइल फायदेशीर ठरतं.