'या' कारणाने महिलांच्या चेहऱ्यावर येतात अनावश्यक केस!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 02:36 PM2018-09-25T14:36:24+5:302018-09-25T14:36:31+5:30

तुम्ही अशा अनेक महिला पाहिल्या असतील ज्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अनावश्यक केस असतात. महिलांच्या त्वचेवर अशाप्रकारे अनावश्यक केस येण्याला मेडिकल भाषेत हिर्सुटिज्म असे म्हटले जाते.

Excess facial hair in women reasons behind it | 'या' कारणाने महिलांच्या चेहऱ्यावर येतात अनावश्यक केस!

'या' कारणाने महिलांच्या चेहऱ्यावर येतात अनावश्यक केस!

तुम्ही अशा अनेक महिला पाहिल्या असतील ज्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अनावश्यक केस असतात. महिलांच्या त्वचेवर अशाप्रकारे अनावश्यक केस येण्याला मेडिकल भाषेत हिर्सुटिज्म असे म्हटले जाते. या समस्येत महिलांच्या त्वचेवर पुरुषांप्रमाणे केस येऊ लागतात. यात मुख्यत्वे ओठांच्या वर, दाढीवर, पाठीवर आणि पोटावर केस येतात. 

महिलांना अशाप्रकारे केस येण्याचं कारण हार्मोन्समधील बदल मानलं जातं. सामान्यपणे महिलांना या अंगांवर केस नसतात किंवा असले तरी ते फार बारीक न दिसणारे असतात. महिलांमध्ये ही समस्या एंड्रोजन हार्मोनचं प्रमाण वाढल्या कारणाने होते. हा हार्मोन पुरुषांमध्ये असतो. चला जाणून घेऊ महिलांना अशा अंगांवर केस येण्याची कारणे.....

एंड्रोजनचं वाढलेलं प्रमाण

महिलांच्या चेहऱ्यावर केस येण्याचं मुख्य कारण हे महिलांमध्ये एंड्रोजन नावाचं मेल हार्मोन अधिक प्रमाणात असणे हे आहे. ( हे पण वाचा : चेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी!)

पॉलिसिस्टीक ओवरियन सिंड्रोम 

महिलांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर दाट केस येण्याचं कारण अंडाशयामध्ये एंड्रोजन जास्त प्रमाणात निर्माण होणे आहे. त्यासोबतच पॉलीसिस्टीक सिंड्रोममुळेही असं होतं. 

एड्रेनल डिसऑर्डर

एड्रेनल ग्लेंड शरीरात ऑरेंज रंगाचं असतं. हे दोन्ही किडनींच्या मधोमध असतं आणि त्रिकोणी आकाराचं असतं. याचं काम हार्मोन्स तयार करण्याचं असतं. एड्रेनल डिसऑर्डरमुळे एंड्रोजनचा स्त्राव अधिक होतो आणि या कारणाने हिर्सुटिज्म ही समस्या होते. 

औषधांचं अधिक सेवन

काही औषधे अशी असतात जी रक्तात एंड्रोजनचं प्रमाण वाढवतात. खासकरुन अॅथलिट आणि बॉडी बिल्डर्सकडून वापरण्यात येणाऱ्या एनाबोलिक स्ट्रोइड, प्रोजेस्टेरॉनचं अधिक प्रमाण असलेल्या गर्भनिरोधक, एन्डोमेट्रीओसिस असलेल्या औषधी आणि हार्मोन्स रिपलेसमेंट थेरपी इत्यादी मुळेही ही समस्या होते. 

हार्मोन्समध्ये बदल

मासिक पाळी बंद झाल्यावर आणि गर्भावस्थेदरम्यान हार्मोन्समध्ये बदल होतात. त्यामुळे महिलाच्या त्वचेवर अनावश्यक केस येतात. 
 

Web Title: Excess facial hair in women reasons behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.