आत्महत्येच्या विचारापासून फेसबुक करणार परावृत्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2016 02:52 PM2016-06-23T14:52:26+5:302016-06-23T20:22:26+5:30

फे सबुक पोस्टवरुन यूजर्संच्या भावनीक व मानसीक आरोग्यावर या फिचरचे लक्ष राहील

Facebook refrains from suicidal thoughts | आत्महत्येच्या विचारापासून फेसबुक करणार परावृत्त

आत्महत्येच्या विचारापासून फेसबुक करणार परावृत्त

Next

/>
वाढत्या ताणतणावामुळे युवक आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. दिवसेंददिवस भारतात या संख्येत मोठी वाढ होत आहे. याकरिता फे सबुक एक नवीन फिचर लाँच क रणार आहे. . आत्महत्येचा कुणी विचार करीत असेल तर, त्याची कॉऊन्सीलिंग करुन त्याला त्यापासून परावृत्त केले जाईल. यूजर्सचे मानसीक संतूलन तणाणमुक्त राहील,हा यामागील उद्देश आहे. फेसबुकने आपले हे फिचर इंग्लंड व अमेरिकामध्ये याअगोदरच लाँच केले आहे. भारतात हे फेसबुक हे नवीन फिचर लवकरच लाँच करणार आहे. याकरिता  दोन एनजीओसोबत फेसबुकची बोलणी सुरु आहे. या दोन्ही एनजीओ फेसबुकवरील तणावग्रस्त युवकांसाठी हेल्पलाईनचे काम करणार आहेत. भारतात फेसबुक युजर्सची संख्या ही मोठी आहे. या नवीन फिचरमुळे तणावणग्रस्ताना  या समस्येतून बाहेर काढणे शक्य होईल. शहरी भागात आत्महत्येचे प्रमाण हे मोठे असूून, घरगुती कारणावरुन त्या होत असल्याचा नॅशनल क्राईम रिकॉर्ड ब्युरोचा अहवाल आहे. शिक्षण व नोकरीमधील अपयशामुळे युवक आत्महत्येचे पाऊल उचलत आहे. 

Web Title: Facebook refrains from suicidal thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.