​फेशियल करण्यापूर्वी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2016 05:30 PM2016-10-21T17:30:03+5:302016-10-21T17:30:03+5:30

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येक तरुणीला वाटते. यासाठी बहुतेकजण फेशियलची मदत घेतात.

Before Facials ... | ​फेशियल करण्यापूर्वी...

​फेशियल करण्यापूर्वी...

Next
ण सुंदर दिसावे असे प्रत्येक तरुणीला वाटते. यासाठी बहुतेकजण फेशियलची मदत घेतात. फेशियल केल्याने चकाकी येऊन चेहरा फ्रेश आणि उजळ दिसतो. यामुळे फेशियल हा चांगलाच व्हायला हवा. फेशियल दरम्यान मसाज हे खूप महत्त्वाचे असते. यामुळे रक्ताभिसरण चांगले होऊन त्वचा फ्रेश दिसते. स्क्रबिंग केल्याने चेहऱ्यावरील मृतपेशी निघून जातात. त्वचा स्वच्छ होते. तुमची त्वचा तेलकट असेल तर दूध आणि मध मिश्रण करुन क्लिंजर करू शकता. क्लिंजर नंतर चेहऱ्याला मॉयश्चरायजर लावल्याने त्वचेत ओलावा टिकून राहतो. तसेच सुरकुत्या येत नाहीत. यामुळे ही स्टेप कधीही विसरू नका. स्टीमिंग केल्याने चेहऱ्यावरील छिद्रे दिसत नाहीत आणि चेहऱ्यावर ग्लो दिसतो. परंतू स्टीमिंग हे फक्त १० मिनिटेच करावे. चेहऱ्यावर टोनर लावणे खूप आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्यावरील मोठी छिद्रे छोटी होतात. तुम्ही गुलाब पाण्याचाही वापर करू शकता. फेशियल करण्यापूर्वी अ‍ॅलोव्हेरा जेल वापरल्यास संसर्ग होत नाही. 

Web Title: Before Facials ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.