चेहऱ्यावरील पिंपल्समुळे त्रस्त आहात?; कांदा करेल मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 11:23 AM2018-12-09T11:23:03+5:302018-12-09T11:25:04+5:30
वातावरणातील धूळ, प्रदूषण किंवा शरीराच्या इतर कारणांमुळे त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते. कालांतराने हे पिंपल्स निघून जातात पण जाताना ते अॅक्ने मागे सोडून जातात.
वातावरणातील धूळ, प्रदूषण किंवा शरीराच्या इतर कारणांमुळे त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते. कालांतराने हे पिंपल्स निघून जातात पण जाताना ते अॅक्ने मागे सोडून जातात. त्यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. प्रदूषण, धूळ, माती यांमुळे चेहऱ्यावर घाण जमा होते. परिणामी चेहऱ्यावर पिंपल्स येतात. चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. यासाठी बाजारात मिळणाऱ्या विविध ब्रँड्सच्या उत्पादनांचा वापर करण्यात येतो. पण या केमिकलयुक्त प्रोडक्ट्सच्या वापरामुळे तेवढ्यापुरतं समाधान होतं किंवा त्वचेच्या इतर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पण तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही काही घरगुती आणि रोजच्या वापरातील पदार्थांचा वापर करून तुम्ही या समस्येपासून सुटका करून घेऊ शकता. आज अशाच एका पदार्थाबाबत सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही त्वचेच्या समस्या दूर करू शकता.
कांदा आणि ऑलिव्ह ऑइल :
पिंपल्स दूर करण्यासाठी एक चमचा कांद्याच्या रसामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिक्स करून चेहऱ्यावर 20 मिनिटांसाठी तसचं ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. असं आठवड्यातून 2 ते 3 वेळा केल्याने पिंपल्सची समस्या दूर होण्यासाठी मदत होईल.
कांदा आणि काकडी :
कांदा आणि काकडी दोन्ही तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. एक चमचा कांद्याचा रस, एक चमचा काकडीचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह ऑइल एकत्र करा. तयार झालेल्या मिश्रणाच्या सहाय्याने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर 15 मिनिटांसाठी तसचं ठेवा आणि कोमट पाण्याने धुवून टाका.
कांदा आणि दूध :
दूध त्वचा उजळवण्यासाठी मदत करतं, तर कांदा पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे या दोघांचा एकत्रपणे वापर करण्यासाठी पाव कप दूधामध्ये 2 चमचे कांद्याचा रस एकत्र करा. तयार पेस्टच्या सहय्याने चेहऱ्यावर मसाज करा. 15 मिनिटांनी चेहरा धुवून घ्या.
कांदा :
पिंपल्स दूर करण्यासाठी दररोज अर्धा कांदा घेऊन चेहऱ्यावर मसाज करा. त्यामुळे चेहऱ्यावरील घाण दूर होते, तसेच पिंपल्स आणि अॅक्नेची समस्याही दूर होण्यास मदत होते.
टीप : प्रत्येकाची स्किन ही वेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्या.