​बाळाला गोडधोड खाऊ घालताय? मग तर हे वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2016 09:17 AM2016-08-24T09:17:35+5:302016-08-24T14:59:36+5:30

साखरेचे प्रमाणा जास्त असलेला डाएट घेतला तर हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणाची शक्यता वाढते.

Feeding baby? So then this is a test | ​बाळाला गोडधोड खाऊ घालताय? मग तर हे वाचाच

​बाळाला गोडधोड खाऊ घालताय? मग तर हे वाचाच

Next
ठाई पाहिली की, सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. आता तर काय आपल्याकडे सणोत्सवाचा काळच सुरु झाला आहे . मग आपसुकच गोडधोड खाण्यसाचे प्रमाण वाढणार. पण तुम्हाला माहीत आहे का, की जास्त प्रमाणात साखर आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहे?

संशोधकांच्या एक गटाने अभ्यास करून पालकांना लहान मुलांना अत्याधिक प्रमाणात साखर/गोड खाऊ न घालण्याचा सल्ला दिला आहे. कारण साखरेचे प्रमाणा जास्त असलेला डाएट घेतला तर हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणाची शक्यता वाढते.

वयोवर्ष दोन ते १८ या गटातील मुलांनी दिवसातून सहा चमच्यांपेक्षा जास्त साखर खाऊ नये. हे प्रमाण म्हणजे दिवसातून १०० कॅलरी किंवा २५ ग्रॅम एवढे आहे. एमरॉय विद्यापीठातील मिरियम व्हॉस यांनी सांगितले की, ‘जे लहान मुलं दिवसातून सहा चमच्यांपेक्षा कमी साखर खातात त्यांचे आरोग्य उत्तम राहते.’

साखरेच अतिसेवन आरोग्यासाठी खूप हानीकारक असते, असे यापूर्वीच्या अनेक अध्ययनातून स्पष्ट झालेले आहे. परंतु लहान वयातदेखील साखर घातक असते असे प्रथमच दिसून आले आहे. त्यामुळे गोड खाण्यावर थोडा ताबा ठेवून मोहाला आवर घातलेलाच बरा.

Web Title: Feeding baby? So then this is a test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.