​पायांना भेगा पडताहेत..!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2016 04:46 PM2016-10-29T16:46:55+5:302016-10-29T16:46:55+5:30

थंडीला सुरुवात झाली आहे. अशा वातावरणात शरीर आणि त्वचेसंबंधी अनेक समस्या समोर येतात....

Feet falling apart! | ​पायांना भेगा पडताहेत..!

​पायांना भेगा पडताहेत..!

Next
डीला सुरुवात झाली आहे. अशा वातावरणात शरीर आणि त्वचेसंबंधी अनेक समस्या समोर येतात. त्यातीलच एक समस्या म्हणजे पायांच्या टाचेला भेगा पडणे होय. बहुतांश जणांना ही समस्या असते. दुखण्याबरोबरच पायाचे सौंदर्यदेखील या समस्येमुळे लुप्त होते. आम्ही आपणास आज या समस्येवर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. 

* अशा समस्येवर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे कांदा होय. जर आपल्या टाचांना भेगा पडल्या असतील तर त्यावर कांद्याचा रस लावा, यामुळे आपल्या टाचा नरम आणि मुलायम होतील. 

* जर आपण या समस्येने त्रस्त असाल तर आपल्या टाचांना पाणी आणि सिरकाच्या मिश्रणात सुमारे १० मिनिटापर्यंत बुडवून ठेवा आणि त्यानंतर धुवून टाका. 

* याशिवाय आपण मधाचादेखील वापर करु शकता. ज्या ठिकाणी भेगा पडल्या आहेत, त्याठिकाणी मध लावून मसाज करु शकता आणि पुन्हा पायांना कोमट पाण्यात ठेवा. मुलायम झाल्यानंतर त्याना ब्रशने घासून साफ करा. 

Web Title: Feet falling apart!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.