'या' 5 चुका करणं टाळाल तर, ब्लॅकहेड्सची समस्या होईल दूर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 06:53 PM2019-06-10T18:53:31+5:302019-06-10T18:57:14+5:30
ब्लॅक हेड्सच्या समस्येमुळे अनेकजण त्रस्त असतात. कितीही प्रयत्न केले तरी हे पुन्हा येतातच. ब्लॅकहेड्स चेहऱ्याच्या त्वचेच्या छोट्या छोट्या पोर्समध्ये ऑइल आणि डेड स्किन सेल्स एकत्र झाल्याने तयार होतात.
ब्लॅक हेड्सच्या समस्येमुळे अनेकजण त्रस्त असतात. कितीही प्रयत्न केले तरी हे पुन्हा येतातच. ब्लॅकहेड्स चेहऱ्याच्या त्वचेच्या छोट्या छोट्या पोर्समध्ये ऑइल आणि डेड स्किन सेल्स एकत्र झाल्याने तयार होतात. साधारणतः हे ब्लॅकहेड्स नाक किंवा आजूबाजूच्या भागांमध्ये दिसून येतात. आपल्यापैकी अनेक लोक ब्लॅकहेड्सपासून सुटका करून घेण्यासाठी अनेक उपाय करतात. पण अशातच अनेक लहान लहान चुका अशा होतात की, ज्यामुळे ब्लॅकहेड्सची समस्या दूर होण्याऐवजी आणखी वाढते. जाणून घेऊया ब्लॅकहेड्स दूर करताना कोणत्या चुका करण्यापासून बचाव केला पाहिजे.
थ्री ट्राई रूल करा फॉलो
ब्लॅकहेड्स काढताना 'थ्री ट्राई रूल' फॉलो करणं गरजेचं असतं. अशातच सर्वात आधी ते ब्लॅकहेड्स दूर करा, जे समोर दिसत आहेत. त्यानंतर छोटे-छोटे आणि त्वचेच्या आतमध्ये लपलेले ब्लॅकहेड्स काढण्याचा प्रयत्न करा. याचाही एक रूल आहे. जे ब्लॅकहेड्स तीन वेळा ट्राय केल्यनंतरही निघत नसतील, ते काढून टाका आणि बाकिचे तसेच राहू द्या. ब्लॅकहेड्स काढताना त्वचेवर जास्त जोर देऊ नका. यामुळे त्वचेवर डाग पडण्याची शक्यता अधिक असते.
जास्त स्क्रब करू नका
स्किन एक्सफोलिएट करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी एका स्क्रबचा वापर करून साबण लावल्याप्रमाणे चेहरा स्वच्छ करा. यामुळे डेड स्किन सेल्स दूर होतात आणि स्किनवरील एक्स्ट्रा ऑइलही निघून जाते. असं आठवड्यातून दोन वेळा करा. पण हलक्या हाताने. जास्त वेळा स्क्रब केलं तर स्किन आधीपेक्षा जास्त ड्राय आणि रफ होऊ शकते.
चेहऱ्याच्या त्वचेला जास्त हात लावू नका
अनेकदा आपल्यापैकी बरेचजण चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स पाहून काढण्यासाठी प्रयत्न करू लागतात. अनेकदा आपण फार प्रयत्न करतो. ज्यामुळे त्वचा निघू लागते. ब्लॅक हेड्सला नखांनी काढल्यानंतर स्किन डॅमेज होते. त्याचबरोबर इन्फेक्शन होण्याची शक्यता आणखी वाढते. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी ब्लॅकहेड्स रिमूव्हर बाजारात उपलब्ध असतात. त्याचा वापर करणं कधीही फायदेशीर ठरतं. त्याऐवजी जर सेप्टी पिन आणि इतर टोकदार वस्तूंचा वापर करत असाल तर ते वेळीच थांबवा. असं करणं त्वचेसाठी घातक ठरू शकतं.
मॉयश्चरायझरची कमतरता
ब्लॅकहेड्स मॉयश्चरायझरच्या कमतरतेमुळेही होऊ शकतात. स्किनमध्ये असलेले नॅचरल ऑइल्स मेन्टन करणं अत्यंत आवश्यक आहे. जर ऑइल त्यापेक्षा कमी झालं तर ब्लॅकहेड्स जास्त होतात. त्यामुळे चेहरा ड्राय होऊ देऊ नका. दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी मॉयश्चरायझरचा वापर करा.
एक्स्ट्रा केअरही गरजेची
चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स काढल्यानंतर स्किनला आफ्टर केअरची गरज असते. त्यामुळे चेहरा मुलायम करण्यासाठी एखादा कूलिंग मास्क नक्की वापरा.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.