चेहऱ्यावर हवा असेल फेस्टिव्ह ग्लो, तर मेकअप टिप्स करा फॉलो!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 11:23 AM2019-10-26T11:23:03+5:302019-10-26T11:28:17+5:30

दिवाळीचा सण म्हटल्यावर मेकअप तयारी करणं आलंच. खासकरून महिलांची सुंदर दिसण्याची चांगलीच हौस दिवाळीत भागते.

Follow these skincare tips for festive glow on your face | चेहऱ्यावर हवा असेल फेस्टिव्ह ग्लो, तर मेकअप टिप्स करा फॉलो!

चेहऱ्यावर हवा असेल फेस्टिव्ह ग्लो, तर मेकअप टिप्स करा फॉलो!

Next

दिवाळीचा सण म्हटल्यावर मेकअप तयारी करणं आलंच. खासकरून महिलांची सुंदर दिसण्याची चांगलीच हौस दिवाळीत भागते. पण नेहमीचं मेकअप करण्याऐवजी एक हटके फेस्टिव्ह ग्लो आला तर सोन्याहून पिवळं होईल ना. मेकअप तर सगळेच करतात, पण एक वेगळी चमक आणि फेस्टिव्ह ग्लो सर्वांच्याच चेहऱ्यावर नसतो. अशात जर तुम्हाला वाटत असेल की, यावेळी दिवाळीला तुमचा हटके लूक असावं तर काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.

टोनिंग आहे गरजेचं

एक चांगल्या क्वालिटीचं टोनर वापरा, जे स्किनची पीएच लेव्हल बॅलन्स करण्यात मदत करेल आणि स्किनवरील धूळ, डेड स्किन दूर होईल. तुम्हाला हवं तर तुम्ही गुलाबजलच्या मदतीने घरीच होममेड टोनरही तयार करू शकता.

स्क्रबिंग फायदेशीर

आठवड्यातून कमीत कमी २ ते ३ वेळा स्क्रब करा. समान प्रमाणात हळद, बेसन आणि दूध मिश्रित करून एक स्क्रब तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. हे चेहऱ्यावर सुकू द्या आणि नंतर काढून टाका. याने त्वचा पिंपल प्री होईल आणि ग्लोइंग दिसेल.

स्किन मास्क

चेहऱ्यावरील धूळीचे कण, मळ आणि अतिरिक्त तेल दूर करून त्वचा स्वच्छ आणि डायड्रेटिंग करणं फार गरजेचं आहे. यासाठी तुम्ही नियमितपणे स्किनवर मास्कचा वापर करा. जर तुमची त्वचा ऑइली असेल तर मुल्तानी माती आणि गुलाबजलचा स्किन मास्क वापरा.

मेकअफ टिप्स

- वॉटरप्रूफ मेकअपचा वापर करा

- फाऊंडेशन हलकं लावा, नाही तर लूक भडक होईल

- दिवाळी असल्याने ग्लिटरी मेकअप लूकचा पर्याय निवडू शकता

- मेकअप काढण्यासाठी खोबऱ्याचं किंवा बदामाचं तेल वापरू शकता


Web Title: Follow these skincare tips for festive glow on your face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.