पावसात पायांची घ्यावी लागते अधिक काळजी, वापरा 'या' सोप्या टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 01:28 PM2019-06-19T13:28:30+5:302019-06-19T13:54:05+5:30
पावसाळा जेवढा आनंद देणारा असतो तेवढाच आरोग्याबाबत काळजी वाढवणारा देखील असतो. या दिवसात आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना तर करावाच लागतो.
(Image Credit :Max Hospital)
पावसाळा जेवढा आनंद देणारा असतो तेवढाच आरोग्याबाबत काळजी वाढवणारा देखील असतो. या दिवसात आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना तर करावाच लागतो, सोबतच त्वचेसंबंधीही समस्या होऊ लागतात. या वातावरणात खासकरून पायांच्या वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. त्यामुळे पावसाळ्यात पायांची खास काळजी घ्यावी लागेत. याच्याच काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत.
(Image Credit : Boldsky.com)
१) या दिवसात पाय दिवसातून तीन ते चार वेळा आवर्जून धुवावे. पाय कोमट पाण्याने आणि साबणाने स्वच्छ धुवावे. नंतर पाय थंड पाण्याने धुवावे. पाय केवळ धुवून चालत नाही तर कोरड्या कापडाने पाय लगेच पुसावे. या दिवसात पायांवर किंवा बोंटाच्या मधे मळ अजिबात राहू देऊ नका.
२) पावसाळ्यात मळलेल्या किंवा दुर्गंधी येणाऱ्या सॉक्सचा वापर टाळा. जर तुम्ही घरीच पेडीक्योर करणार असाल तर याची काळजी घ्या की, तुम्ही जे प्रॉडक्ट वापरत असाल ते तुमच्या पायांना सूट होईल असंच वापरा. पाय दगडाने किंवा कापडाने घासून स्वच्छ केले पाहिजे.
(Image Credit : Sugar Ki Bimari)
३) या दिवसात खासकरून पायांची टाच घासून घासून स्वच्छ करावी. तसेच या दिवसात तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या फूट स्क्रबरचा वापर करू शकता. झोपतानाही पाय स्वच्छ धुवावे आणि मॉइश्चरायजर लावावं. तसेच या दिवसात नखेही जास्त लांब ठेवू नये. लांब नखांमुळेही आजार होऊ शकतात.
४) नखांमध्ये माती जमा झाली तर बॅक्टेरिया जमा होऊ तुम्ही आजारी पडू शकता. जर असं वाटत असेल की, पायांवर सूज आली आहे की, गरम पाण्यात तुरटी टाकून त्यात १० ते १५ मिनिटांसाठी पाय ठेवून बसा. हा उपाय आठवड्यातून ३ ते ४ वेळा केल्यास पायांची सूज दूर होईल.
(Image Credit : Enrich Salon)
५) पावसाच्या पाण्यात पाय जास्त वेळ भिजले तर पायांवर पुरळ येते. हे दिसायला जरी छोटे दिसत असले तरी मांसाच्या आत गाठ तयार होते. नंतर जोरदार वेदनाही होऊ लागतात. तसेच पाय खाली ठेवल्यावर टोचल्यासारखंही वाटतं. पायांवर अशाप्रकारची पुरळ आली तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.