हिवाळ्यात सुंदर त्वचा मिळवण्यासाठी 'हे' फेसपॅक नक्की ठरतील फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 02:47 PM2020-01-13T14:47:47+5:302020-01-13T14:56:19+5:30
त्वचेशी निगडीत समस्या आपल्याला नेहमीच जाणवत असतात.
(image credit- Glimgirlco.in)
त्वचेशी निगडीत समस्या आपल्याला नेहमीच जाणवत असतात. हिवाळ्यात सगळ्यात जास्त जाणवणारी समस्या ती म्हणजे त्वचा कोरडी पडणे. हिवाळ्यात चेहरा आणि त्वचा कोरडा पडल्यामुळे त्वचा चांगली दिसत नाही. चेहरा पांढरा पडलेला असतो. यामुळे चेहर्याची चमक निघून चेहरा निस्तेज दिसायला लागत असतो. अनेक स्त्रिया त्वचेचा मऊ मुलायम ठेवण्यासाठी महागड्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असतात. पण या उत्पादनामुळे त्वचेचं मोठं नुकसान होऊ शकतं. महागड्या उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा घरच्याघरी काही उपायांचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा सुंदर बनवू शकता.
आरोग्य चांगलं राहण्यासाठी किंवा उर्जा मिळण्यासाठी आपण नेहमीच आहारात फळांचा समावेश करत असतो. पण याच फळांचा वापर जर तुम्ही त्वचेसाठी केला तर कोणत्याही केमिकल्सचा वापर न करता तुमची त्वचा उजळेल. चला तर मग जाणून घेऊया कसा तयार करायचा फेसपॅक.
केळ्याचा फेसपॅक
केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक एसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. पोटाच्या अनेक विकारांवर केळी फायदेशीर आहे. केळी नियमित खाल्ल्याने पचन क्रिया सुरळीत राहते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी राखण्यासही मदत होते. त्वचेसाठी सुद्धा केळी खाणं तितकचं महत्वाचं आहे. यासाठी केळ्याचा पॅक तुम्हाला तयार करावा लागेल. (हे पण वाचा-केसांना तेल लावण्याचा काही उपयोग नाही! जर तुम्ही 'या' चुका करत असाल...)
यासाठी केळ्याला चांगलं मॅश करून घ्या. चांगलं ब्लेंड झाल्यानंतर चेहर्याला लावा. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. चेहरा धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. त्यानंतर त्वचेवर गुलाबाचं टोनर लावा. असं केल्यास त्वचेवरील काळपटपणा दूर होऊन त्वचा चमकदार दिसेल.
सफरचंदाचा फेसपॅक
सफरचंद हा शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करतो. सफरचंदामुळे शरीरात एक रोग प्रतिकारक यंत्र कार्यान्वित होते. सफरचंदाच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात. त्वचेसाठी सुद्धा सफरचंद महत्वाचं आहे. यासाठी सफरचंद कापून किसून घ्या. त्यात बेसनाचे पीठ घालून चेहर्याला लावा. त्यामुळे ते व्यवस्थित चिकटेल. त्यानंतर १० ते २० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. याप्रमाणे इतर पध्दतीने तुम्ही फेसपॅक वापरू शकता. सफरचंदाच्या रसात गुलाब पाण्याचे काही थेंब टाकून चेहर्यावर चोळल्यावर सावळा रंग उजळविण्यास मदत होते.