घरी तयार केलेले 'हे' फेसपॅक वापरल्यास 5 मिनिटांत त्वचा होईल तजेलदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 07:04 PM2019-04-01T19:04:00+5:302019-04-01T19:04:42+5:30

सध्याच्या दिवसांमध्ये कामाचा ताण आणि घरची जबाबदारी यांमुळे अनेक महिलांना स्वतःसाठी वेळ काढणं शक्य होत नाही.

Get glowing and fair skin in just 5 minutes with these face packs | घरी तयार केलेले 'हे' फेसपॅक वापरल्यास 5 मिनिटांत त्वचा होईल तजेलदार!

घरी तयार केलेले 'हे' फेसपॅक वापरल्यास 5 मिनिटांत त्वचा होईल तजेलदार!

Next

(Image Credit : perceptionglobalmedia.com)

सध्याच्या दिवसांमध्ये कामाचा ताण आणि घरची जबाबदारी यांमुळे अनेक महिलांना स्वतःसाठी वेळ काढणं शक्य होत नाही. खासकरून त्यांच्यासाठी ज्या ऑफिससोबतच घराच्या जबाबदाऱ्याही सांभाळतात. अशातच आम्ही तुम्हाला काही फेसपॅक्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर केल्याने फक्त 5 मिनिटांमध्येच त्वचा उजळण्यासोबतच ग्लो येण्यास मदत होते. 

फेसपॅक लावण्याआधी लक्षात ठेवा की, तुम्ही फेस व्यवस्थित क्लीन करणं गरजेचं असतं. फेसवॉशने चेहरा धुवून घ्या आणि त्यानंतर स्क्रब करा. यामुळे पोर्स ओपन होतील आणि फेसपॅकचा स्किनवर जास्त परिणाम होईल. 

नॉर्मल स्किन

एका बाउलमध्ये लिंबाचा रस आणि अर्धा चमचा मध एकत्र करा. त्यामध्ये एक टेबलस्पून ओट्स घेऊन एकत्र करा त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. पाच मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. 

ऑयली स्किन 

तीन टेबलस्पून काकडीचा रस घेऊन त्यामध्ये एक टेबलस्पून अॅपल व्हिनेगर एकत्र करा. कॉटनच्या मदतीने हे चेहऱ्यावर लावा. 5 मिनिटांनी हे ठंड पाण्याने धुवून टाका. चेहऱ्यावरील ऑइल आणि पोर्स क्लीन करण्यासाठी हा फेसपॅक मदत करतो. 

ड्राय स्किन 

ड्राय स्किन असणाऱ्यांनी लिंबाच्या रसाचा वापर करणं टाळा. कारण त्यांना यामुळे जळजळ होऊ शकते. बाउलमध्ये काकडीचा किस आणि मध एकत्र करा. यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर थोडीशी मलई एकत्र करा. पाच मिनिटांसाठी चेहऱ्यावर फेसपॅक तसाच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने फेसपॅक धुवून टाका. काकडी आणि मध त्वचा उजळवण्यास मदत करतात आणि मलई त्वचेचा ड्रायनेस दूर करण्यासाठी मदत करते. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Get glowing and fair skin in just 5 minutes with these face packs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.