नितळ, तजेलदार त्वचेसाठी करा बटाट्याचा वापर !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 08:04 PM2019-02-05T20:04:12+5:302019-02-05T20:05:36+5:30
बटाट्याची भाजी तर आपण सर्वच खातो. स्वयंपाक घरातही अनेकदा कांद्यासोबत बटाटा असतोच. बटाटा आरोग्यासाठीही उपयोगी ठरतो. कारण त्यामध्ये आयर्न, व्हिटॅमिन सी आणि रायबोफ्लेविन मुबलक प्रमाणात असतं.
बटाट्याची भाजी तर आपण सर्वच खातो. स्वयंपाक घरातही अनेकदा कांद्यासोबत बटाटा असतोच. बटाटा आरोग्यासाठीही उपयोगी ठरतो. कारण त्यामध्ये आयर्न, व्हिटॅमिन सी आणि रायबोफ्लेविन मुबलक प्रमाणात असतं. पण हा बटाटा आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरतो. तुम्ही बटाट्यापासून घरच्या घरी फेस पॅकही तयार करू शकता. बटाट्याचा वापर त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी आणि डोळ्यांखालील डार्क सर्कल्स दूर करण्यासाठीही करता येऊ शकतो. कच्च्या बटाट्याचा रस डोळ्यांखालील डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी उपयोगी असतो. हा रस स्किनवरील ओपन पोर्स बंद करण्यासाठीही मदत करतो. ज्यामुळे स्किन टाइट राहते आणि वाढत्या वयाची लक्षणंही कमी दिसतात. हा फेस पॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतो. पण हा तयार करण्यासाठीही अत्यंत सोपा असतो. जाणून घेऊया बटाट्याचा फेस पॅक तयार करण्याची पद्धत...
बटाटा आणि दही
एक मोठा चमचा बटाट्याची पेस्ट तयार करा. यामध्ये एक मोठा चमचा दही एकत्र करा. तयार पेस्ट जवळपास अर्धा तासासाठी तशीच ठेवा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर अप्लाय करा. ही पेस्ट स्किन ग्लो करण्यासोबतच टाइट करण्यासाठीही मदत करते.
बटाटा आणि हळद
बटाटा आणि हळदीच्या फेस पॅकचा नियमितपणे वापर केल्याने स्किन टोन आणि रंग लाइट होतो. अर्धा बटाटा किसून घ्या आणि त्यामध्ये एक चिमूटभर कॉस्मेटिक हळद एकत्र करा. त्यानंतर तयार पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा आणि अर्धा तासानंतर स्वच्छ करा.
बटाटा आणि मुलतानी माती
बटाट्यापासून तयार केलेला हा पॅक स्किन ग्लो वाढविण्यासाठी मदत करतो. तसेच हा डाग दूर करण्यासोबतच सूज कमी करण्यासाठीही मदत करतो. हा फेस पॅक तयार करण्यासाठी बटाट्याती साल न काढता पेस्ट तयार करा. त्यामध्ये 3 ते 4 चमचे मुलतानी माती आणि काही थेंब गुलाबाचे पाणी एकत्र करा. तयार पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा आणि 30 मिनिटांनतर चेहरा धुवून टाका. हा फेस पॅक काही दिवस नियमितपणे लावल्याने स्किन ग्लो करण्यास मदत होते.
बटाटा आणि दूध
अर्ध्या बटाट्याची साल काढून त्याचा रस काढून घ्या. त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे कच्चं दूध एकत्र करा. हे व्यवस्थित एकत्र करून चेहरा आणि मानेवर लावा. त्यानंतर 20 मिनिटांनंतर धुवून टाका. एका आठवड्यातून तीन वेळा हा पॅक लावल्याने काही दिवसांतच तुम्हाला फर जाणवू लागेल.