हॉट कॅंडल वॅक्स मसाजचे त्वचेसाठी हे फायदे वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 10:58 AM2019-03-01T10:58:05+5:302019-03-01T10:59:40+5:30

वाढत्या वयासोबत जर बारीक रेषा, सुरकुत्या येऊ लागल्या तर त्यावर उपाय म्हणून नको नको ते केलं जातं. पार्लरमध्ये हजारो रूपये खर्च केले जातात.

Get a hot candle wax massage wrinkles fine lines will disappear | हॉट कॅंडल वॅक्स मसाजचे त्वचेसाठी हे फायदे वाचून व्हाल थक्क!

हॉट कॅंडल वॅक्स मसाजचे त्वचेसाठी हे फायदे वाचून व्हाल थक्क!

Next

(Image Credit : Hamman Marbella)

वाढत्या वयासोबत जर बारीक रेषा, सुरकुत्या येऊ लागल्या तर त्यावर उपाय म्हणून नको नको ते केलं जातं. पार्लरमध्ये हजारो रूपये खर्च केले जातात. पण अशात काही वेगळेही उपाय आहेत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही ही समस्या दूर करू शकता. त्यातील एक उपाय म्हणजे हॉट कॅंडल मसाज. हॉट कॅंडल मसाजने तुमची सैल झालेली त्वचा टाइट होते आणि त्वचा तरूण दिसते. चला जाणून घेऊ हॉट कॅंडल मसाजचे फायदे...

कॅंडल वितळवली जाते

(Image Credit : Cannabis Now)

या थेरपीमध्ये मेणबत्तीला जाळून वितळवलं जातं. जेव्हा यातून मेणाचं पाणी निघायला लागतं तेव्हा हे मेणाचं पाणी शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर स्क्रब केलं जातं. त्यानंतर गरम टॉवेल शरीराला गुंडाळला जातो. याप्रकारे शरीरावरील डेड स्कीन मॉइश्चराइज केली जाते आणि नंतर त्वचेवर ब्रायटनिंग पॅक लावला जातो. याने त्वचा चमकू लागते आणि टाइट सुद्धा होते. 

संपूर्ण शरीराची मसाज 

ही मसाज संपूर्ण शरीरावर केली जाऊ शकते. वेगवेगळ्या दृष्टीने ही मसाज शरीरासाठी फायदेशीर ठरते. या मसाजमुळे डेड स्कीन सेल्स नष्ट होतात आणि शरीरातील रक्तप्रवाह वाढतो. 

स्ट्रेच मार्क्स दूर करा

या मसाजच्या मदतीने रक्तप्रवाह वेगाने होतो, ज्यामुळे त्वचेवर आलेले डाग किंवा स्ट्रेच मार्क्सपासून तुमची सुटका होते. केवळ तीन ते चार वेळा ही मसाज केल्यावर तुमचे स्ट्रेच मार्क्स दूर होऊ शकतात. 

चेहऱ्यावर करा वॅक्स मसाज

- डोळ्यांच्या खाली तीन बोटं ठेवा, ज्यावर कॅंडल वॅक्स लागलेलं असावं. हे १० सेकंदासाठी तसंच प्रेस करून ठेवा आणि नंतर दूर करा. पुन्हा एकदा तसंच करा. दिवसातून दोनवेळी हा उपाय करा. याने डोळ्यांखाली सैल झालेली त्वचा नैसर्गिकरित्या टाइट होऊ लागेल. सोबतच डोळ्यांच्या आजूबाजूला आलेली सूजही याने दूर होईल. 

- रिंग फिंगरवर वॅक्स लावा आणि याने आयब्रोजवर प्रेशर टाका. हे कमीत कमी ७ सेकंदासाठी करा. आयब्रोजवर प्रेशर टाकल्याने डोळे वरच्या बाजूने सरकतील. याने रक्तप्रवाह वेगाने होईल आणि डार्क सर्कलसारख्या समस्या दूर होतील.

- वॅक्स घेऊन डोळ्यांच्या  दोन्ही टोकावर रिंग फिंगर ठेवा आणि थोडं स्ट्रेच करा. कमीत कमी ३ सेकंदासाठी प्रेशर तसंच ठेवा आणि नंतर सोडा. याने सुरकुत्या कमी होतील. 

- हातांची पहिल्या आणि मधल्या बोटाने V आकार तयार करा. त्यानंतर दोन्ही हात डोळ्यांच्या खाली ठेवा आणि हलकं प्रेशर द्या. हे कमीत कमी तीन सेकंदासाठी करा. असं तीन वेळा करा. तिन्ही वेळ वॅक्स लावलेल्या बोटांनी ही प्रक्रिया करा. 
 

Web Title: Get a hot candle wax massage wrinkles fine lines will disappear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.