पिंपल्सने असाल हैराण तर 'हे' ४ उपाय ठरतील बेस्ट, लगेच दूर होईल तुमची समस्या! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 11:24 AM2019-10-04T11:24:00+5:302019-10-04T11:24:07+5:30

पिंपल्सची समस्या नेहमीच तरूण-तरूणींमध्ये तारूण्यात सुरू होऊन अनेक वर्ष राहते. काही महिलांमध्ये ही समस्या ती ते चार वर्षातच दूर होते.

Get rid of acne or pimples by these easy home remedies | पिंपल्सने असाल हैराण तर 'हे' ४ उपाय ठरतील बेस्ट, लगेच दूर होईल तुमची समस्या! 

पिंपल्सने असाल हैराण तर 'हे' ४ उपाय ठरतील बेस्ट, लगेच दूर होईल तुमची समस्या! 

Next

पिंपल्सची समस्या नेहमीच तरूण-तरूणींमध्ये तारूण्यात सुरू होऊन अनेक वर्ष राहते. काही महिलांमध्ये ही समस्या ती ते चार वर्षातच दूर होते. पण काहींमध्ये ३० ते ३५ वयापर्यंत ही समस्या बघायला मिळते. काही लोकांना छोटे तर काहींना मोठा पस होणारे आणि वेदना देणारे पिंपल्स होतात. या पिंपल्सना हात लावला, दाबले तर त्वचेवर डाग-खड्डे पडू लागतात. त्यामुळे असं करणं टाळलं पाहिजे. पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी काही खास उपाय आम्ही सांगत आहोत.

१) कडूलिंबाच्या पानांची पेस्ट

कडूलिंबाच्या पानांच्या पेस्टने पिंपल्स दूर करण्यास मदत मिळते. यासाठी कडूलिंबाच्या पानांची पेस्ट तयार करा, त्यात थोडं पाणी टाका आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. नियमित हा उपाय केल्याने पिंपल्स दूर होऊ लागतात. 

२) जायफळ आणि दूध

जायफळाचं पावडर दुधात मिश्रित करू पेस्ट तयार करा. पिंपल्सवर ही पेस्ट चांगल्याप्रकारे लावा. पेस्ट कोरडी झाल्यावर चेहरा पाण्याने धुवावा. ही पेस्ट तुम्ही रात्री चेहऱ्यावर लावू शकता. पण जायफळाची तुम्हाला अॅलर्जी नाही हे जाणून घेण्यासाठी आधी हातावर या पेस्टचा एक पॅच मारून बघा.

३) आय ड्रॉप

आय ड्रॉप केवळ डोळ्यात टाकण्याच्या कामाच नाही तर तुम्ही याचा वापर पिंपल्स दूर करण्यासाठी देखील करू शकता. याने पिंपल्समध्ये होणारी वेदना आणि जळजळ दूर होईल. जेव्हाही पिंपल्समुळे जळजळ होत असेल किंवा वेदना होत असेल तर त्यावर आय ड्रॉप लावा.

४) पेपरमिंट

पेपरमिंटची पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर जिथेही पिंपल्स आहेत, तिथे पेपरमिंट पेस्ट चांगल्याप्रकारे लावा. काही वेळ पेस्ट तशीच राहू दिल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. काही दिवस हा उपाय कराल तर पिंपल्स दूर होती.

Web Title: Get rid of acne or pimples by these easy home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.