'हा' आहे डार्क सर्कल दूर करण्याचा परमनंट उपाय, ३ दिवसात दिसणार फरक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 11:42 AM2018-08-31T11:42:26+5:302018-08-31T11:43:27+5:30
आहारातून पोषक तत्वांची कमतरता अशा आणखीही काही कारणांनी डार्क सर्कल्स येतात. सायनोसायटिस, अॅलर्जी आणि अस्थमाने ग्रस्त पीडित लोकांनाही ही समस्या होते.
डोळ्यांच्या चारही बाजूंना पडणाऱ्या काळ्या डागांमुळे महिला फार हैराण दिसतात. झोप पूर्ण न होणे, मानसिक ताण, जास्त वेळ उन्हात घालवणे, सतत डोळ्यांना थकवणारे काम करणे, आहारातून पोषक तत्वांची कमतरता अशा आणखीही काही कारणांनी डार्क सर्कल्स येतात. सायनोसायटिस, अॅलर्जी आणि अस्थमाने ग्रस्त पीडित लोकांनाही ही समस्या होते.
यासोबतच डिलेव्हरीनंतर महिलांना ही समस्या होते. तसेच अनुवांशिक कारणांनी सुद्धा ही समस्या होते. तर काही लोकांच्या डोळ्यांची बनावटच तशी असते. डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा ही फार नाजूक असते. त्यामुळे प्रदूषण आणि उन्हाच्या संपर्कात येऊन ही त्वचा काळी पडते.
काय आहे उपाय?
रोज कमीत कमी ८ तासांची झोप
दिवसा घराबाहेर पडताना सन ग्लासेस वापरणे
जर डोळ्यांच्या आजूबाजूला काळे डाग असतील तर कच्च्या बटाट्याची किंवा काकडीची पेस्ट लावा
चेहरा दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवा
व्हिटॅमिन सी, के आणि व्हिटॅमिन इ असलेले क्रीम यासाठी वापरु शकता.
पोषक आहार
आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनात महिला आपल्या आरोग्याकडे आणि आहाराकडे फार लक्ष देत नाहीत. त्यामुळे तरुण असतानाच डोळ्यांच्या चारही बाजूने बारीक रेषा दिसू लागतात. हसताना किंवा जांभई देताना त्वचेवर ताण पडतो. क्रॅश डायटिंग याचं प्रमुख कारण आहे. जर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर याने त्वचा आकुंचन पावतात आणि सुरकुत्या वाढतात. त्यामुळे पोषक आहार घेणे यासाठी फार महत्वाचे आहे.
अशात दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. ताजी फळे, ज्यूस, ताक, लिंबू पाणी आणि लस्सीचे सेवन करावे. नेहमी तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. क्रॅश डायटिंग टाळा कारण याने वजन कमी झाल्यावर त्वचा सैल पडते आणि सुरकुत्या दिसू लागतात.