चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 04:17 PM2019-03-12T16:17:22+5:302019-03-12T16:18:06+5:30
चेहऱ्यावर, नाक आणि गळ्याच्या आसपास झालेले ब्लॅकहेड्स संपूर्ण सौंदर्य नष्ट करतात. अनेकदा त्यासाठी पार्लरचा आधार घेण्यात येतो.
चेहऱ्यावर, नाक आणि गळ्याच्या आसपास झालेले ब्लॅकहेड्स संपूर्ण सौंदर्य नष्ट करतात. अनेकदा त्यासाठी पार्लरचा आधार घेण्यात येतो. पण पार्लरच्या ट्रिटमेंट्सचा वापर करून ते काढणं पेनफुल ठरतं. पार्लरमध्ये ब्लॅकहेड्स पोर्सवर दाब देऊन काढण्यात येतात. पण असं केल्याने हाताच्या नखांचे निशाण पडतात. तसेच ब्लॅकहेड्सपासून सुटका करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्येही बदल करणं आवश्यक असतं. अशातच ब्लॅकहेड्सची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपायही ट्राय करू शकता. यामुळे तुम्हाला पार्लरमधील वेदनादायी ट्रिटमेंट करण्याची गरज भासणार नाही आणि कोणतेही साइड इफेक्ट होणार नाहीत.
स्क्रबिंग
2 चमचे बेकिंग सोडा, 1/2 चमचा मीठ आणि 1 चमचा पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. या स्क्रबने चेहऱ्यावर मसाज करा आणि त्यानंतर हलक्या गरम पाण्याने चेहरा धुवून टाका.
लिंबाची साल
लिंबाची साल ब्लॅकहेड्सपासून सुटका करण्यासाठी मदत करते. साल घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील तेल हळूहळू कमी होतं आणि ब्लॅकहेड्सपासून सुटका होण्यास मदत होते.
ओटमील मास्क
1 कप ओटमीलमध्ये एक छोटा चमचा बेकिंग सोडा आणि 3 छोटे चमचे कोरफडीचा रस एकत्र करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर हलक्या गरम पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
टॉमेटो
1 टॉमेटो चार तुकड्यांमध्ये कापून घ्या. एक तुकडा घेऊन चेहऱ्यावर त्याने मसाज करा आणि कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. शक्य असल्यास तुम्ही दररोज हे करू शकता.
बदामाचा मास्क
ओटमील, बदामाची पावडर आणि पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. हे चेहऱ्यावर लावा आणि जेव्हा चेहऱ्यावर लावलेलं मिश्रण सुकेल तेव्हा मसाज करत काढून टाका. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
एस्ट्रीजेंट
एका कापसाच्या बोळ्यावर एस्ट्रीजेंटचे काही थेंब घ्या आणि चेहरा स्वच्छ करा. रात्री झोपण्यापूर्वी याने चेहरा स्वच्छ करून झोपा.
मध
मध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील घाण दूर करण्यासाठी मदत होते. जेव्हा मध सुकून जाइल त्यावेळी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. चेहऱ्यावर फेस मास्क किंवा स्क्रब लावण्याआधी चेहऱ्याला 10 मिनिटांसाठी वाफ द्या. त्यानंतर स्क्रब करा.