टीस्पून मसाजसोबत नातं जोडा, त्वचेवरील सुरकुत्यांचं टेन्शन सोडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 11:35 AM2018-11-22T11:35:55+5:302018-11-22T11:38:28+5:30

जसंजसं वय वाढत जातं तशी वाढत्या वयाची लक्षणे त्वचेवर दिसू लागतात. अशात त्वचेवर सुरकुत्या येणे, त्वचा सैल होणे या समस्या होतात.

Getting rid of wrinkles do teaspoon massage | टीस्पून मसाजसोबत नातं जोडा, त्वचेवरील सुरकुत्यांचं टेन्शन सोडा!

टीस्पून मसाजसोबत नातं जोडा, त्वचेवरील सुरकुत्यांचं टेन्शन सोडा!

Next

(Image Credit : www.healthyfoodplace.com)

जसंजसं वय वाढत जास्त तशी वाढत्या वयाची लक्षणे त्वचेवर दिसू लागतात. अशात त्वचेवर सुरकुत्या येणे, त्वचा सैल होणे या समस्या होतात. त्वचेचा लवचिकपणा कमी होऊ लागतो. कमी वयातच तुम्ही वृद्ध दिसू लागता. पण हे टाळायचं असेल तर टीस्पून मसाज तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. टीस्पून मसाजच्या माध्यमातून तुम्ही त्वचा सुंदर आणि तजेलदार ठेवू शकता. 

टीस्पून मसाजचे फायदे

वाढत्या वयात त्वचेमध्ये अनेकप्रकारचे हार्मोनल बदल होतात. याच कारणाने त्वचेची लवचिकता कमी होते. त्वचेचा ओलावा आणि मुलायमपणा नष्ट होतो. पण या समस्या तुम्ही टाळू शकता. तेही एका छोट्या चमच्या मदतीने. टीस्पून मसाज करुन तुम्ही सुरकुत्यांची समस्या दूर करु शकता. 

टीस्पून मसाजमुळे त्वचेतील अतिरीक्त तरल पदार्थ बाहेर निघतात. ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधारणा होते आणि सुरकुत्या कमी होतात. चेहरा तजेलदार दिसू लागतो. जर तुम्हाला चांगले परिणाम हवे असतील तर तुम्हाला सतत १० ते १५ दिवस हा उपाय करावा लागेल.

काय आवश्यक

टीस्पून मसाजसाठी काही चम्मच, एक ग्लास थंड पाणी, आइस क्यूब, कोमट ऑलिव्ह ऑइल आणि काही छोट्या वाट्यांची गरज पडेल.

कशी कराल मसाज?

सर्वातआधी चेहऱ्यावरील मेकअप काढा. एखाद्या फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर चेहऱ्यावर एखादं लाइट मॉइश्चरायझर लोशन किंवा तेल लावा. ग्लासमध्ये आइस क्यूब आणि थंडी पाणी टाकून त्यात सर्व चम्मच टाका.

आता थंड झालेला चमचा पापण्यांवर तोपर्यंत ठेवा, जोपर्यंत त्यांचा थंडावा दूर होत नाही.याचप्रकारे दुसऱ्यावर डोळ्यावर ही प्रक्रिया करा. आता चमचा कोमट ऑलिव्ह ऑइलमध्ये ठेवा. याने चेहऱ्यावर आणि मसाज करा. १० वेळा असे केल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा. तुमची त्वचा काही दिवसात तजेलदार दिसायला लागेल. 

(टिप: या उपायांनी तुम्हाला फायदा होईलच याचा दावा आम्ही करत नाही. कारण प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते. काहींना याचे दुष्परिणामही भोगावे लागू शकतात. आम्ही केवळ माहिती म्हणून हे उपाय सांगत आहोत. हे उपाय करण्याआधी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार याचा वापर करावा की नाही याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
 

Web Title: Getting rid of wrinkles do teaspoon massage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.