चेहऱ्यावर वॅक्सिंग करताना या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं... नाही तर वेळेआधीच म्हातारे दिसाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 12:44 PM2019-10-03T12:44:05+5:302019-10-03T12:52:09+5:30
चेहऱ्यवरील नको असलेल्या केसांपासून सुटका करण्यासाठी मुली ब्लीच करतात किंवा चेहऱ्यावर वॅक्सिंग करतात. तसेच याव्यतिरिक्तही अनेक ब्युटी प्रोडक्ट्स आणि ट्रिटमेंटचा आधार घेतात.
चेहऱ्यवरील नको असलेल्या केसांपासून सुटका करण्यासाठी मुली ब्लीच करतात किंवा चेहऱ्यावर वॅक्सिंग करतात. तसेच याव्यतिरिक्तही अनेक ब्युटी प्रोडक्ट्स आणि ट्रिटमेंटचा आधार घेतात. त्यातल्यात्यात अनेक महिला वॅक्सिंगचा आधार घेताना दिसतात. पण तुम्हाला माहीत आहे का? वॅक्सिंग करताना अनेक गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं. अन्यथा तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. जाणून घेऊया की, फेस वॅक्सिंग करण्याआधी तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. त्याबाबत...
स्वतः करून नका फेसवॅक्स...
अनेकदा मुलींना असं वाटतं की, फेस वॅक्सिंग करणं अत्यंत सोपं आहे. त्यामुळे त्या घरी स्वतःच वॅक्स करू लागतात. परंतु, अशातच कधीही तुम्ही हे घरीच करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कोणाच्या तरी मदतीने तुम्ही फेस वॅक्स स्ट्रिप्सचा वापर करू शकता.
स्वच्छतेची घ्या काळजी...
वॅक्सिंग करण्याआधी चेहरा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या. त्यासाठी तुम्ही फेसवॉशचाही वापर करू शकता. चेहरा स्वच्छ असेल तरच वॅक्सिंग केल्यानंतर चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर होण्यास मदत होईल.
स्क्रब आणि ब्लीच करताना काळजी घ्या...
वॅक्सिंग करण्याआधी 12 तास अगोदर किंवा नंतर ब्लीच, स्क्रबिंग किंवा कोणताही फेसपॅक त्वचेवर लावू नका. त्यामुळे त्वचेला नुकसान पोहोचतं. तसेच वॅक्सिग केल्यानंतर फेसवॉश किंवा साबणाचाही वापर करू नका.
स्किन टाइप लक्षात घ्या...
वॅक्स करण्याआधी तुमचा स्किन टाइप नक्की लक्षात घ्या. जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर एखाद्या स्किन स्पेशलिल्टचा सल्ला घ्या. त्यामुळे यानंतर तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही.
चेहऱ्यासाठी योग्य असेल ते वॅक्स निवडा...
चेहऱ्यावर वापरण्यात येणारं वॅक्स इतर वॅक्सपेक्षा वेगळं असतं. त्यामुळे चेहऱ्यावर वॅक्सिंग करताना योग्य वॅक्सची निवड करा. अन्यथा स्किन रॅशेज, त्वचेवर पूरळ येणं, जळजळ होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यासाठी तुम्ही एलोवेरा, हनी वॅक्सचा वापर करू शकता.
चेहऱ्यावरील केसांची वाढ लक्षात घ्या...
चेहऱ्यावरील केसांची ग्रोथ कमी असेल तर अजिबात वॅक्स करू नका. केसांची ग्रोथ जास्त असेल तर वॅक्सिंग करणं फायदेशीर ठरतं. छोटे केस काढण्यासाठी तुम्ही थ्रेडिंगचा वापर करू शकता.
आता जाणून घेऊया की, वॅक्सिंग केल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असतं त्याबाबत...
- वॅक्सिंग केल्यानंतर स्किन लाल झाली असेल किंवा त्यावर रॅशेज आले असतील तर त्यावर बर्फ लावा किंवा आइस क्यूबने मसाज करा.
- जळजळ जास्त होत असेल तर मुलतानी माती, कोरफडीचा गर किंवा काकडीचा रस लावा.
- वॅक्स केल्यानंतर वॅक्सिंग लोशन लावा. तुम्ही गरज असल्यास फेस सीरमही लावू शकता.
- एखादी सुंगधी क्रिम अजिबात लावू नका. त्यामुळे जळजळ होऊ शकते.
- वॅक्सिंग केल्यानंतर 24 तासांसाठी अजिबात उन्हामध्ये जाऊ नका.
- 24 तासांसाठी स्विमिंग पूलमध्ये स्विमिंगही करू नका.
- चेहरा एखाद्या सिंथेटिक कपड्याने स्वच्छ करू नका. त्यासाठी नॅपकिनचा वापर करा.
- साबणाऐवजी चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेसवॉशचा वापर करा.
- वॅक्सिन केल्यानंतर गॅसच्या जवळ अजिबात काम करू नका. वॅक्सिंग केल्यानंतर स्किन पोर्स ओपन होतात. अशातच यामुळे त्वचेला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते.
त्वचेला नुकसान पोहोचण्याची असते शक्यता...
फेस वॅक्सिंग करणं हानिकारकही असू शकतं कारण चेहऱ्याची त्वचा सॉफ्ट असते. अशातच सतत वॅक्सिंग केल्यामुळे वेळेआधीच रिंकल्स पडू शकतात. तसेच अनेकदा वॅक्सिंग केल्यामुळे हेअर फॉलिकल्सला नुकसान पोहोचतं. ज्यामुळे इन्फेक्शन आणि सूज यांसारख्या समस्या उद्भवतात. यामुळे डागही पडू शकतात. त्यामुळे वॅक्स करण्याआधी सावध राहणं आवश्यक असतं.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)