​केसांना द्या सेलेब्रिटी लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2016 12:23 PM2016-11-05T12:23:24+5:302016-11-05T12:32:01+5:30

सेलेब्रिटींसारखी आपली हेअरस्टाईल असावी असे बऱ्याच जणींना वाटते. एखादा चित्रपट आल्यानंतर त्यातील हेअरस्टाईल बराच काळ लोकांच्या लक्षात राहते. अलीकडच्या काळात जेनेलिया देशमुख, याना गुप्ता, मंदिरा बेदी, शिल्पा शेट्टी, कॅटरिना कैफ, प्रियांका चोप्रा यांच्या हेअरस्टाईल आकर्षक असतात.

Give hair to celebrity look | ​केसांना द्या सेलेब्रिटी लूक

​केसांना द्या सेलेब्रिटी लूक

Next
सेलेब्रिटींसारखी आपली हेअरस्टाईल असावी असे बऱ्याच जणींना वाटते. एखादा चित्रपट आल्यानंतर त्यातील हेअरस्टाईल बराच काळ लोकांच्या लक्षात राहते. अलीकडच्या काळात जेनेलिया देशमुख, याना गुप्ता, मंदिरा बेदी, शिल्पा शेट्टी, कॅटरिना कैफ, प्रियांका चोप्रा यांच्या हेअरस्टाईल आकर्षक असतात. या सेलिब्रिटींची हेअरस्टाईल कशापद्धतीची आहे, तुम्हाला अशा पद्धतीने हेअरस्टाईल करावयाची असल्यास काय करावे याची माहिती देताहेत आंतरराष्ट्रीय ब्युटीशियन आणि हेअर कन्सलटंट सुनीता मोटवानी-मखिजा.



फ्लर्टी फ्रिंज
जेनेलियाची स्टाईल-उत्तम केस हे महत्त्वाचे आहेत. तिचा फ्रिंज लूक खूपच आकर्षक वाटतो. यासाठी हेअर स्पा ट्रीटमेंट करा आणि ब्लो ड्राय हेअरसाठी माऊसे वापरा. फ्रिंज लूक येण्यासाठी राऊंड ब्रशचा वापर करा. 


क्यूट क्रॉप

याना गुप्ता असो की मंदिरा बेदी या नेहमीच क्यूट क्रॉप पद्धतीची स्टाईल करतात. यामुळे त्यांचा लूक अधिक सुंदर दिसतो. तुमचे केस कोरडे करा आणि त्यावर टेक्श्चर्ड क्रीम वापरा.


टसल्ड लूक
शिल्पा शेट्टीसारखा लूक. यासाठी हीटेड रोलरचा वापर करा आणि तुमच्या केसांना आकर्षक लूक द्या.


स्लीक स्ट्रेट हेअर, चीक लूक

कॅटरिनाचे अशा पद्धतीचे ट्रेंडी कट असणारे लांब केस. यासाठी सीरमचा वापर करा. पॅडल ब्रशने ब्लो ड्राय करा. तुमच्या केसांना चकाकी येण्यासाठी हेअर शाईनचा वापर करा.


डार्क लॉक्स
प्रियंका चोप्रा लूक- डार्क, उत्तम कट असलेले केस खूप छान दिसतात. यासाठी राऊंड ब्रशनचा वापर करा, ब्लो ड्राय करा आणि लो होल्ड स्प्रे वापरुन केसांना खास लूक द्या.

तुम्हाला जर सेलेब्रिटीसारखे केस हवे असतील तर फार काही करावे लागणार नाही. त्यासाठी खास टिप्स
चकाकी वाढव्विण्यासाठी तुम्हाला महागड्या हेअर स्पामध्ये जावे लागणार नाही. यासाठी डीप कंडिशनर आणि केसांभोवती रॅप क्लिंग फिल्म लावा. १० ते २० मिनिटे ते तसेच राहू द्या. त्याचवेळी सीरम, शाईन स्प्रे किंवा नॉन अमोनिया हेअर कलरचा वापर करा. यामुळे ग्लॉसी लूक येईल.
कलर कॉम्प्लिमेंटस: तुमच्या केसांना रंग येण्यासाठी क्राऊन हायलाईटस्चा वापर करा. हे खूप महागडे नाही आणि नवीन लूक येईल.
लिव्ह इन कंडीशनर आणि सीरम वापरुन तुमच्या केसांमधील मॉयश्चर वाढवा. आकर्षक केस लाखो लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल.
कोणतेही कंडीशन्ड केस तुमच्या लूकला अधिक श्रीमंत करतात. तुमच्या केसांना शाम्पू आणि कंडीशन वेळेवर करा. तुमचे केस कशाही पद्धतीने हाताळू नका.
तुमचा लूक चांगला दिसण्यासाठी अनेक स्वस्तामधील उपाय आहेत. स्क्रंचिज, टिक टॅक, पिन्स, बटरफ्लाईजचा वापर करा.

Web Title: Give hair to celebrity look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.