उत्तम आरोग्यासाठी झोपेचे वेळापत्रक आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2016 02:45 PM2016-07-08T14:45:38+5:302016-07-08T20:15:38+5:30

आजच्या या धावपळीच्या युगात अनेकांना हे वेळापत्रक पाळणे शक्य होत नाही. त्यामुळेच आजाराचे प्रमाण हे वाढत आहे.

For a good health, sleep schedules are necessary | उत्तम आरोग्यासाठी झोपेचे वेळापत्रक आवश्यक

उत्तम आरोग्यासाठी झोपेचे वेळापत्रक आवश्यक

googlenewsNext
 
r />एकवेळेला जेवण नसले तरी चालू शकते. परंतु, रात्रीला शरीरासाठी झोप ही अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता नियत्यनियमाने दररोज रात्रीला झोपण्याचे व सकाळी उठण्याचेही वेळापत्रक पाळणे गरजेचे आहे. अन्यथा विविध  प्रकाराच्या आजारांना  सामोरे जावे लागते.
दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढत्या व्यापामुळे अनेकांचे वेळेवर झोपणे होत नाही. दररोज झोपण्याचा वेळ बदलत असल्याने, सकाळी वेळेवर उठणे शक्य होत नाही. त्यामुळेच विविध समस्या उद्भवतात त्याची ही माहिती.
अपुºया झोपेचे तोटे
रात्रीला शरीराला सहा ते आठ तास झोप ही आवश्यक आहे. पुरेशी झोप झाली नाही तर बीपी, थॉयराईड आदी शारीरिक आजार उद्भवतात. चेहºयावर उत्साह राहत नाही. आॅफिसमध्ये व वाहन चालवितानाही झोप येते. रात्री उशीरापर्यंत टी.व्ही. बघीतल्याने पचनासंबंधी विविध आजार होतात.  नेहमी मानसीक दुर्बलता आल्यासारखे वाटते. त्यामुळे आपली पर्सनॉलिटीही उठवून दिसत नाही. याचा सर्व परिणाम हा आपल्या कामाच्या ठिकाणीही होऊन,आपला रेकॉर्ड सुद्धा खराब होऊ शकतो.
जास्त झोपेचे तोटे
लवकर उठणे व लवकर झोपणे ही आरोग्यासाठी उत्तम सवय आहे. परंतु, अनेकजण रात्रीला लवकर झोपूनही सकाळी वेळेवर उठत नाही. त्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. त्याकरिता सूर्यादयासोबत उठणे हे आवश्यक आहे.
काय घ्यावी काळजी
झोपेसंबंधी काळजीही घेणे आवश्यक आहे. त्याकरिता जेवणानंतर ताबडतोड  काहीजण झोपी जातात. हे चांगले लक्षण नसून,जेवणानंतर एक ते दीड तासाने झोपावे. झोपण्याूपर्वी थोडे पायी चालावे.  जास्त झोप व कमी झोप हे एक मानसीक आजाराचे लक्षण आहे. लहान मुलांना सुद्धा झोपेच्या विविध समस्या अलीकडे निर्माण होत आहे. त्याकरिता पालकांनी सजग होणे गरजेचे आहे.  झोपेसंबंधी कोणतीही समस्या उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.




मोबाईल, टीव्हीचा दुष्परिणाम
आजघडीला मोबाईल व टी.व्ही. सुद्धा झोपेला मोठा अडथळा ठरत आहे. रात्री उशीरापर्यंत टीव्हीवरील कार्यक्रम बघीतले जातात. त्यामुळे कुटुंबातील सर्वचजण जागी राहतात. तसेच मोबाईल घरात मुलाच्या हाती दिल्याने ते रात्री उशीरापर्यंत मोबाईलवरच गेम खेळण्यात गुंतलेले असतात. झोपेची वेळ होऊनही ते झोपत नाहीत. या अशा बदलत्या जीवनशैलीमुळेही आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत आहे. यामुळे मुलांच्या अभ्यासावरही परिणाम होतो.

घोरणे
झोपेत कुणी घोरत असेल तर आपण काय शांत झोपला अशी सहज त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतो. परंतु, हे घोरणे आरोग्याला फार घातक आहे. ब्लड प्रेशर, डायबेटीस, हार्ट अटॅक यासारखे घोरण्यामुळे आजार जडू शकतात. त्यामुळे या घोरण्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. झोपेत घोरण्याºया व्यक्तिचे कंठ बंद होऊन, शरीराला मिळणाºया आॅक्सीजनचे प्रमाण हे कमी होते. श्वास थांबल्याने हा आवाज होतो, इतरानाही या घोरण्याचा त्रास होतो. तसेच स्वत : दचकून जाग येते व एकाग्रताही राहत नाही. मूडही सतत बदल असतो. तसेच घसा व तोंड कोरडे पडते. घोरणे हाआजार नाही असा आजही समाजात गैरसमज आहे. त्यामुळे आजही त्याच्याकडे म्हणावे तसे गांभीर्याने पाहिले जात नाही. म्हणून दिवसेंदिवस हा आजार बळावत चालला आहे. त्याकरिता आरोग्य विभागाने जनजागृती करणे आवश्यक आहे. आपल्या घरामध्ये रात्रीला झोपेत कुणी असे घोरत असेल तर उपचार करुन घेणे गरजेचे आहे. अन्यथा हा आजार बळावतो. त्याकरिता वेळीच पावले उचलावीत.




 

Web Title: For a good health, sleep schedules are necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.