​द्राक्ष करतात लठ्ठपणाचा धोका कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2016 01:03 PM2016-05-05T13:03:35+5:302016-05-05T18:33:35+5:30

सॅच्युरेटेड फॅटचा समावेश असलेल्या आहारासोबत जर द्राक्ष खाल्ले तर लठ्ठपणाची शक्यता तर कमी होते

Grapes reduce the risk of obesity | ​द्राक्ष करतात लठ्ठपणाचा धोका कमी

​द्राक्ष करतात लठ्ठपणाचा धोका कमी

Next
वळ प्रौढांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येदेखील लठ्ठपणाची (ओबेसिटी) समस्या गंभीर बनलेली आहे. लठ्ठपणा येण्याची शक्यता कमी करण्यासाठी एका सोपा उपाय संशोधकांच्या हाती लागला आहे.

सॅच्युरेटेड फॅटचा समावेश असलेल्या आहारासोबत जर द्राक्ष खाल्ले तर लठ्ठपणाची शक्यता तर कमी होतेच, त्याबरोबरच आतड्यातील चांगल्या बॅक्टेरिआचीसुद्धा वृद्धी होते, असे नव्या रिसर्चमध्ये दिसून आले आहे.

द्राक्षांमुळे हाय फॅट आहाराचे दूष्परिणाम कमी होऊन हृदयविकार, अतितणाव आणि मधुमेह यांसारख्या गंभीर रोगांचा धोकासुद्धा कमी होतो. द्राक्षांमध्ये पॉलिफेनॉल्स नावाचे अँटीआॅक्सिडंट असते जे बॉडी फॅट, त्वचेखालील मेद घटविण्याचे काम करते.

हाय फॅट आणि तीन टक्के द्राक्षांचा सामावेश असलेल्या आहरा (ज्यामध्ये 33 टक्के ऊर्जा फॅटपासून मिळते) 11 आठवडे घेतल्यानंतर पहिल्या अध्यायनाअंती एकूण बॉडी फॅटचे प्रमाण कमी आढळले.

दुसऱ्या अध्ययनामध्ये आहारात आणखी जास्त फॅट (ज्यामध्ये 44 टक्के ऊर्जा फॅटपासून मिळते) आणि  वेगवेगळ्या प्रकारच्या सॅच्युरेटेड फॅटचा समावेश करण्यात आला. 16 आठवड्यांच्या निरीक्षणाअंती देखील सारखेच निष्कर्ष दिसून आले.

नॉर्थ कॅरोलिना विद्यापिठातील प्रमुख संशोधक मायकल मॅक्लेन्टॉश यांनी माहिती दिली की, द्राक्षामध्ये असणाऱ्या पॉलिफेनॉल्समुळे हाय फॅट डाएटचे अनेक दूष्पररिणाम कमी होतात आणि तसेच आतड्यांच्या क्षमतेमध्येसुद्धा सुधारणा होते.

Web Title: Grapes reduce the risk of obesity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.