कमी वयातच पांढरे झालेले केस पुन्हा करा काळे, कसे ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 02:37 PM2019-07-09T14:37:23+5:302019-07-09T14:42:57+5:30
सर्वांनाच चमकदार, सुंदर आणि काळे केस हवे असतात. पण अलिकडे कमी वयातच केस पांढरे होऊ लागले आहेत. वाढत्या वयानुसार, केस पांढरे होणे सामान्य बाब आहे.
(Image Credit : Hair Mag)
सर्वांनाच चमकदार, सुंदर आणि काळे केस हवे असतात. पण अलिकडे कमी वयातच केस पांढरे होऊ लागले आहेत. वाढत्या वयानुसार, केस पांढरे होणे सामान्य बाब आहे. पण कमी वयातच केस पांढरे होत असल्याने अनेकजण हैराण आहेत. अशात ते वेगवेगळे केमिकल्स ट्राय करतात. मात्र त्यांना फायदा होतोच असं नाही. अशात आम्ही केस काळे करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय घेऊन आलो आहोत.
पौष्टिक आहाराचा समावेश
(Image Credit : SBS)
केसांना काही लावण्याचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा तुमचा आहार चांगला असेल. अनेकदा पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे केस वेळेआधीच पांढरे होतात. त्यामुळे चारचौघात लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो. पण हे टाळण्यासाठी आणि सुंदर, चमकदार केस मिळवण्यासाठी पौष्टिक आहार घेणे सुरू करा.
कांद्याचा रस
(Image Credit : Organic Facts)
कांद्याचे काही तुकडे मिक्सरमधून चांगले बारिक करा. ते पिळून त्यातून रस काढा आणि डोक्याच्या त्वचेवर मसाज करा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास फायदा बघायला मिळेल.
तेल लावा
(Image Credit : Sri Vijaya Ganapathy Stores)
केसांना नियमितपणे तेल लावणे फार गरजेचं आहे. खोबऱ्याचं तेल आणि बदामाचं तेल एकत्र लावल्याने अधिक फायदा होतो.
आवळा
जर केस फार जास्त पांढरे होत असतील तर तुमच्यासाठी आवळ्याच्या आणि जास्वंदाच्या फुलांचा वापर फार फायदेशीर ठरेल. आवळा आणि जास्वंदाची फुले आणि तिळाचं तेल यांची पेस्ट तयार करा. यात काही थेंब खोबऱ्याचं तेल टाका आणि याने डोक्याच्या त्वचेची मसाज करा.