टेन्शन घेणं आणि केस पांढरे होणं यांचा संबंध काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 03:17 PM2018-12-18T15:17:34+5:302018-12-18T15:17:49+5:30

आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच आनंदासोबतच अनेक दुखाचे क्षणही येतात. अशातच दिवसभराच्या कामाची धावपळ, घरातील प्रॉब्लेम्स, ऑफिसमधील कामाचा ताण यांसारख्या गोष्टींमुळे आयुष्यात अनेक टेन्शन्सचा सामना करावा लागतो.

Grey hair cause stress | टेन्शन घेणं आणि केस पांढरे होणं यांचा संबंध काय?

टेन्शन घेणं आणि केस पांढरे होणं यांचा संबंध काय?

Next

आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच आनंदासोबतच अनेक दुखाचे क्षणही येतात. अशातच दिवसभराच्या कामाची धावपळ, घरातील प्रॉब्लेम्स, ऑफिसमधील कामाचा ताण यांसारख्या गोष्टींमुळे आयुष्यात अनेक टेन्शन्सचा सामना करावा लागतो. तणावाची कारणं प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असतात. कारण प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. अनेकांचा असा समज असतो की, ताण घेतल्यामुळे व्यक्ती फक्त मानसिकरित्या खचते. पण हा समज चुकीचा आहे. तणावामुळे व्यक्ती शारीरिकरित्याही खचते. तसेच तणावाचा प्रभाव व्यक्तीच्या त्वचेवर आणि केसांवरही होतो. अनेकदा केस गळण्याच्या किंवा केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. काही लक्षणांबाबत माहीत करून घेतल्यानंतर तुम्ही या समस्या दूर करू शकता. जाणून घेऊया अशा काही लक्षणांबाबत, ज्यांचा उपयोग करून तुम्ही तणावामुळे होणाऱ्या समस्यांपासून सुटका करून घेऊ शकता.

तणावामुळे केसांवर होणारा परिणाम :

  • केस पांढरे होणं
  • केस पातळ होणं
  • केस रूक्ष आणि निर्जीव दिसणं
  • केस गळणं

 

केस पांढरे होणं 

अशा अनेक कारणांमुळे केस पांढरे होण्याची समस्या वाढते. तसेच तणावही केस पांढरे होण्याचं कारण ठरतं. अनेक प्रकरणांमध्ये केस पांढरे होण्याचं कारण तणाव असल्याचं स्पष्ट झालं आहे. ही समस्या तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. 

केस पातळ होणं 

जर तुम्ही सतत तणावात राहत असाल तर, व्यक्ती व्यवस्थित जेवत नाही. जेवणावर परिणाम झाल्यामुळे शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व मिळत नाहीत. त्यामुळे शरीरात होणाऱ्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केसांची वाढ होत नाही. तसेच शरीराच्या इतर समस्यांचा सामना करावा लागतो. परिणामी केस पातळ होतात. 

केस रूक्ष आणि निर्जीव दिसणं

जेव्हा तुम्ही तणावाने पीडित असता त्यावेळी त्याचा परिणाम शरीरावर होतो. तसेच सर्वात जास्त परिणाम केसांवर झालेला दिसून येतो. तणावामुळे पोषक तत्व केसांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. ज्यामुळे केस रूक्ष दिसू लागतात. 

केस गळणं

तणावामुळे कोर्टिसोल हार्मोन स्त्रवतात. त्यामुळे हेयर फॉलिकल्‍सच्या आजूबाजूला अपशिष्ट पदार्थ उत्सर्जित करतात. ज्यामुळे तुमचे केस पातळ होऊन सुकून जातात. त्यामुळे केस गळण्याची समस्या उद्धभवते. 

केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठी हे उपाय करा :

- केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला जीवनशैली बदलणं गरजेचं असतं. तणावापासून दूर राहणं गरजेचं असतं. सकाळी लवकर उठा आणि रात्री लवकत झोपा. तसेच टेक्निकल वस्तू म्हणजेच मोबाइल किंवा लॅपटॉपचा वापर कमी करा. 

- जेवण्याची वेळ निश्चित करा, संतुलित आहार घ्या. फळं आणि भाज्यांचे सेवन जास्तीत जास्त करा. कारण यामध्ये ती सर्व तत्व असतात, जी केसांसाठी आवश्यक असतात. 

- सकाळी एक तास व्यायाम किंवा योगासनं करा. रोज सकाळी  मॉर्निंग वॉकसाठी जा. यामुळे मोठ्या प्रमाणावर तणाव दूर होण्यास मदत होईल. 

- केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि हेल्दी ठेवण्यासाठी तेलाने मसाज करा. आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा मोहरीचं तेल, बदामाचं तेल आणि ऑलिव्ह ऑइलने स्काल्पला मसाज करा. मसाज करण्यासाठी कोमट तेलाचा वापर करा. तसेच केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर करा. 

- जर जास्त केस गळत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. एखाद्या गोष्टीच्या संक्रमणामुळेही हा आजार होऊ शकतो. 

Web Title: Grey hair cause stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.