'या' स्टायलिश हेयर एक्सेसरीज तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हव्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 02:53 PM2019-04-18T14:53:59+5:302019-04-18T14:54:37+5:30

जेव्हा गोष्ट सुंदर हेयर स्टाइल्सची असते, त्यावेळी चर्चा सुरू होते ती हेयर एक्ससरीजची. एक सुंदर हेयरस्टाइल मॅचिंग हेयर एक्ससरीजशिवाय अपूर्ण असते.

Hair accessories you must have in your collection | 'या' स्टायलिश हेयर एक्सेसरीज तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हव्या

'या' स्टायलिश हेयर एक्सेसरीज तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हव्या

Next

जेव्हा गोष्ट सुंदर हेयर स्टाइल्सची असते, त्यावेळी चर्चा सुरू होते ती हेयर एक्ससरीजची. एक सुंदर हेयरस्टाइल मॅचिंग हेयर एक्ससरीजशिवाय अपूर्ण असते. जर तुम्हालाही तुमच्या केसांचा मेकओवर करण्याची इच्छा असेल तर केस मोकळे ठेवण्याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या हेयरस्टाइल्स ट्राय करू शकता. या हेयरस्टाइल्ससाठी तुम्ही हेयर एक्ससरीजची मदत घेऊ शकता. यामुळे तुम्हाला हटके आणि क्लासी लूक मिळण्यास मदत होईल...

हेयर बॅन्ड 

जेव्हा गोष्ट हेयर एक्सेसरीजची असते, त्यावेळी सर्वात पहिलं नाव येतं ते हेयर बॅन्डचं. जेव्हा तुम्ही एखाद्या पार्टिमध्ये किंवा मित्र-मैत्रिणीच्या संगीतमध्ये फ्री होऊन डान्स करता. त्यावेळी हेयर बॅन्ड फार मदत करतो. कारण यामुळे तुम्ही केसांना चेहऱ्यावर येण्यापासून रोखू शकता. हेयर बॅन्ड एक अशी एक्ससरीज आहे, जी कोणत्याही केसांवर सट होते. काही हेयर बॅन्ड्स फार सिंम्पल पण क्लासी असतात. तर काहींवर वर्क करण्यात आलेलं असतं. त्यामुळे ते आणखी सुंदर दिसतात. 

हेयरपिन

काळ्या रंगाच्या नॉर्मल बॉबी पिन्सपासून थोडे वेगळे पर्ल किंवा एखाद्या गोष्टीने सजलेली हेयर पिन ट्राय करा. तुम्ही या पिन्स केसांमध्ये लावून अटेंशन गेन करू शकता. एखाद्या पार्टिमध्ये किंवा फंक्शनला जाताना हटके लूक करण्यासाठी हे पिन्स तुम्हाला नक्की मदत करतील.  

हेयर स्कार्फ

हेयर स्कार्फ फक्त उन्हापासून रक्षण करण्यासाठी वापरण्यात येणारी गोष्ट नाही, तुम्ही तुमच्या केसांना स्टायलिश पद्धतीने वापरून फॅशन आयकॉन बनू शकता. हेयर स्कार्फ एक बेस्ट हेयर एक्ससरीज म्हणून वापरू शकता. खरं तर हेयर स्कार्फचा उपयोग केसांचं उन्हापासून रक्षण करण्यासाठी वापरण्यात येतो. परंतु तुम्ही वेगळ्या पद्धतीने ट्राय करून केसांचं उन्हापासून बचाव करण्यासोबतच क्लासी लूकही मिळवू शकता. 

टिक टॅक क्लिप्स 

केस डोळ्यांवर येत असतील तर आपण टिक टॅक क्लिप्सचा वापर करतो. पण हेयर स्टाइल ट्राय करण्यासाठीही तुम्ही हे क्लिप्स वापरू शकता. बाजारामध्ये अनेक कलर्समधील आणि वर्क केलेले क्लिप्स उपलब्ध असतात. तुम्ही तुमच्या चॉइसनुसार क्लिप्स वापरू शकता. 

Web Title: Hair accessories you must have in your collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.