'या' 5 घरगुती उपायांनी मिळवा केस गळण्याच्या समस्येपासून सुटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 11:43 AM2018-12-31T11:43:24+5:302018-12-31T11:50:21+5:30

केसांच्या समस्यांमध्ये प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे, केस गळणं. त्यासाठी महागाड्या पार्लर ट्रिटमेंट घेण्यापासून ते बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करण्यापर्यंत अनेक उपाय करण्यात येतात.

Hair Care Tips : 5 natural tips to prevent hair loss | 'या' 5 घरगुती उपायांनी मिळवा केस गळण्याच्या समस्येपासून सुटका!

'या' 5 घरगुती उपायांनी मिळवा केस गळण्याच्या समस्येपासून सुटका!

Next

केसांच्या समस्यांमध्ये प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे, केस गळणं. त्यासाठी महागाड्या पार्लर ट्रिटमेंट घेण्यापासून ते बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करण्यापर्यंत अनेक उपाय करण्यात येतात. परंतु तरिही या समस्येपासून सुटका मिळत नाही. सर्व उपाय करूनही केस गळणं काही थांबत नाही. पण काही घरगुती उपयांचा समावेश तुम्ही तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात केल्याने तुम्हाला या समस्येपासून सुटका करून घेणं शक्य होतं. जाणून घेऊया काही घरगुती उपायांबाबत...

1. हॉट ऑइल ट्रिटमेंट 

कोणतंही नॅचरल ऑइल केसांसाठी फायदेशीर ठरतं. त्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइल, नारळाचं तेल किंवा करडईच्या तेलाचा वापर करू शकता. पण लक्षात ठेवा केसांना मसाज करण्यासाठी तेल कोमट गरम करा, जास्त गरम करू नका. त्यानंतर हाताच्या बोटांच्या सहाय्याने केसांच्या मुळांना मसाज करा. जवळपास एक तासाभरासाठी केसांना तेल लावून ठेवा. त्यानंतर शॅम्पूने केस धुवून टाका. 

2. मेडिटेशन करा 

जास्तीत जास्त लोकांना अति ताणामुळे केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. तुम्ही टेन्शन किंवा वाढत्या तणावाचा सामना करत असाल तर मेडिटेशन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शरीरातील हार्मोन्स बॅलेन्स करण्यासाठी मेडिटेशन उपयोगी ठरतं. त्यामुळे दररोज सकाळी उठल्यावर मेडिटेशन करा. त्यामुळे केस गळण्याच्या समस्येसोबच शरीराच्या इतर समस्या दूर होण्यासही मदत होईल. 

3. अॅन्टीऑक्सिडंट 

एक कप गरम पाण्यामध्ये ग्रीन टीच्या दोन बॅग बुडवून ठेवा. त्यानंतर हे पाणी केसांच्या मुळांना लावा आणि साधारणतः एक तासाभरासाठी तसचं ठेवून केस धुवून टाका. ग्रीन टीमध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट असतात. जे केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठी आणि केसांच्या वाढिसाठी फायदेशीर ठरतात. 

4. हेड मसाज 

दररोज हेड मसाज घेतल्याने मेंदूतील रक्तप्रवाह सुरळीत होतो. रक्तप्रवाह सुरळीत राहिल्याने केसांना मजबुती मिळते. तुम्ही हेड मसाजसाठी नैसर्गित तेलांचा वापर करू शकता. यामुळे तणावपासूनही सुटका होते आणि रक्तप्रवाही सुरळीत होतो. 

5. नैसर्गिक ज्यूस

एखादा नैसर्गिक ज्यूस म्हणजेच, लसणाचा रस, आल्याचा रस किंवा कांद्याचा रस केसांना मालिश करण्यासाठी वापरू शकता. रात्री झोपताना डोक्याच्या त्वचेला या रसाने मसाज करा आणि सकाळी उठून केस धुवून घ्या. त्यामुळे केसांची मुळं मजबुत होतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते. 

Web Title: Hair Care Tips : 5 natural tips to prevent hair loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.