केस गळणं थांबण्यासाठी केस धुण्याच्या २० मिनिटं आधी लावा बटाट्याचा रस, मग बघा कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 07:32 PM2020-08-16T19:32:33+5:302020-08-16T19:35:59+5:30
कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी महागडे, ब्रँडेड शाम्पू वापरण्याऐवजी हा सोपा घरगुती उपाय करून बघा. बटाटाच्या रस स्काल्फ आणि केसांना लावा.
केस गळण्याची समस्या सध्याच्या वातावरणात सगळ्याच वयोगटातील लोकांना उद्भवते. धुळ, प्रदूषण याशिवाय शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक न मिळाल्यास केस गळण्याची समस्या उद्भवते. सध्या लॉकडाऊनमध्ये घरी असल्यामुळे बाहेरच्या धुळीशी फारसा संबंध येत नाही. तरिही अनेकांना केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. पण यासाठी तुम्हाला लगेचच स्पा आणि महागड्या ट्रिटमेंटसाठी सलूनमध्ये जाण्याची काहीही गरज नाही. घरच्याघरी बटाट्याच्या रस वापरून तुम्ही रिजल्ट मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसा तयार करायचा केसांसाठी फायदेशीर असलेला बटाट्याचा रस.
बटाट्याचे केसांना फायदे
कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी महागडे, ब्रँडेड शाम्पू वापरण्याऐवजी हा सोपा घरगुती उपाय करून बघा. बटाटाच्या रस स्काल्फ आणि केसांना लावा. २० मिनिटे किंवा तासाभराने केस थंड पाण्याने धुवा. यामुळे केस स्वच्छ, मजबूत आणि काळेभोर होतील. तसंच कोंड्याची समस्या ही दूर होईल.
केसांना सुंदर आणि काळेभोर होण्यासाठी बटाटा उपयुक्त ठरत असतो. ज्या लोकांना केस गळण्याची समस्या जाणवते अशा लोकांनी जर बटाट्याचा वापर केला तर फायद्याचं ठरेल. त्यामुळे केसांची वाढ चांगली होईल. बटाट्यात असलेले व्हिटामीन सी आणि आर्यन, व्हिटमीन बी केसांना बळकटी देण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच याचा वापर केसांवर केल्यामुळे रक्तभिसरण व्यवस्थित होऊन केस गळणं बंद होतं.
कच्चा बटाट्याच्या रसात anti-inflammatory म्हणजेच दाहशामक गुणधर्म असतात. कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी महागडे, ब्रँडेड शाम्पू वापरण्याऐवजी हा सोपा घरगुती उपाय करून बघा. बटाटाच्या रस स्काल्फ आणि केसांना लावा. २० मिनिटे किंवा तासाभराने केस थंड पाण्याने धुवा. यामुळे केस स्वच्छ, मजबूत आणि काळेभोर होतील. तसंच कोंड्याची समस्या ही दूर होईल.
असा तयार करा.
सगळ्यात आधी एक मध्यम आकाराचा बटाटा घ्या, नंतर बटाटा किसून त्याचा रस गाळून घ्या. बटाट्याचा रस हाताने पिळून घेतला तरी चालेल. एका भांड्यात रस काढून कापसाने केसांच्या मुळांना लावा. संपूण डोक्याला हा रस लावून झाल्यानंतर २० मिनिट वाट पाहा. त्यानंतर केस धुवून टाका. चांगला रिजल्ट दिसण्यासाठी आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग करा.
मऊ आणि मुलायम केसांसाठी १ ते २ बटाटे किसून घ्या. यामध्ये मध आणि अंड्याचा पिवळा भाग मिसळा. ही पेस्ट केसांना लावा. हा हेअर पॅक सुकू द्यावा. त्यानंतर केस शाम्पूने स्वच्छ धुवावेत. केस धुण्यासाठी जर तुम्ही कोमट पाण्याचा वापर केला तर फायदेशीर ठरेल.
केसांमध्ये कोंड्याचा त्रास दूर करण्यासाठी बटाट्याच्या रसात दही आणि लिंबाचा रस मिसळा. हा पॅक केसांना मूळासकट लावा. २ तासांनी केस सौम्य शाम्पूने धुवावेत. आठवडा भरात २-३ वेळा हा प्रयोग करा. यामुळे कोंड्याचा त्रास कमी होईल. केस लांब वाढवण्यासाठी बटाट्याच्या रसात कोरफडीचा रस मिसळा. हा पॅक केसांवर लावा. त्यानंतर पूर्ण सुकल्यावर थंड पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. यामुळे दीर्घकाळ केसांचं सौंदर्य टिकायला मदत होते.
हे पण वाचा-
... म्हणून तुमच्या दाढीचा लूक बिघडतो; 'या' टीप्स वापरून मिळवा हॅण्डसम लूक
'या' चुकांमुळे शेविंगनंतर त्वचेवर बारीक दाणे येतात, हॅण्डसम लूकसाठी वापरा 'हा' खास फंडा