डर्मेटोलॉजिस्टने सांगितलं कमी वयात केस पांढरे होण्याची कारणे, सोबतच सांगितलं काही उपाय...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 12:57 PM2024-09-13T12:57:50+5:302024-09-13T12:58:38+5:30
Grey Hair Causes : वेगवेगळे उपाय करूनही लोकांचे केस काळे होत नाहीत. अशात डर्मेटोलॉजिस्ट डॉ. नीरा नाथन यांनी केस पांढरे का होतात याची कारणं सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Grey Hair Causes : सामान्यपणे असं मानलं जात होतं की, वाढत्या वयांच्या लोकांचेच केस पांढरे होतात. पण आजकाल लोकांच्या चुकीच्या सवयी आणि बदलत्या सवयींमुळे कमी वयातच लोकांचे केस पांढरे होतात. केस कमी वयातच पांढरे होणं ही एक गंभीर समस्या आहे. वेगवेगळे उपाय करूनही लोकांचे केस काळे होत नाहीत. अशात डर्मेटोलॉजिस्ट डॉ. नीरा नाथन यांनी केस पांढरे का होतात याची कारणं सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
केस पांढरे होणं कसं रोखाल?
डॉ. नीरा नाथन यांनी सांगितलं की, जर तुम्ही कमी वयात केस पांढरे होणं रोखायचं असेल तर सगळ्यात आधी हे काम करा की, तुम्ही एक ब्लड टेस्ट करा. ही टेस्ट करून हे जाणून घ्या की, तुमच्या शरीरात व्हिटॅमिन किंवा आयर्नची कमतरता तर नाही. शरीरात जर या गोष्टी कमी असतील तर केस कमी वयातच पांढरे होतात.
केस पांढरे होण्याचं आणखी एक मुख्य कारण...
कमी वयात केस पांढरे होण्याचं आणखी एक मुख्य कारण म्हणजे जास्त तणाव घेणं. तणाव घेणं कमी कलं तर केस पुन्हा काळे होऊ लागतात. अशात तणाव कमी घ्या किंवा तणाव देणाऱ्या गोष्टींचा विचार कमी करा.
स्मोकिंग आणि टॅनिंगही आहे कारण...
स्मोकिंग किंवा टॅनिंग हेही केस पांढरे होण्याचं कारण आहे. डर्मेटोलॉजिस्ट सांगतात की, उन्हामुळे ऑक्सीडेटिव स्ट्रेस सेल्सचं पिग्नेंट डॅमेज होतं आणि यामुळे केसांच्या मुळांचं नुकसान होतं. ज्यामुळे केस पांढरे होतात.