Hair care tips: खेळताना रंग बाई होळीचा! घ्या केसांची 'अशी' काळजी, नाहीतर केसांचे हाल पाहुन पस्तावाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 01:52 PM2022-03-17T13:52:58+5:302022-03-17T13:55:01+5:30

रंगांनी खेळताना कितीही जपलं तरी केसांची हालत खराब होते. केसांची शायनिंग, चमकही कमी होते. पण, काळजी करण्याची गरज नाही, काही तेल आणि हेअर मास्क वापरून आपण केसांना पुन्हा मुलायम, चमकदार करू शकतो, त्याविषयी (Hair Care Tips for Holi 2022) जाणून घेऊ.

hair care tips during Holi color festival | Hair care tips: खेळताना रंग बाई होळीचा! घ्या केसांची 'अशी' काळजी, नाहीतर केसांचे हाल पाहुन पस्तावाल

Hair care tips: खेळताना रंग बाई होळीचा! घ्या केसांची 'अशी' काळजी, नाहीतर केसांचे हाल पाहुन पस्तावाल

Next

होळी खेळताना आपल्याला भरपूर मजा येते मात्र, काहीजण डोक्याला-तोंडाला खूप रंग लावतात. होळीचे वेगवेगळे रंग आपल्या त्वचेवर केसांवर राहतात. केसांमधील रंग बाहेर काढण्यासाठी अनेक दिवस मेहनत घ्यावी लागते. यासोबतच त्वचेवर आणि केसांवरही याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे त्वचा आणि केस कोरडे आणि निस्तेज होतात. रंगांनी खेळताना कितीही जपलं तरी केसांची हालत खराब होते. केसांची शायनिंग, चमकही कमी होते. पण, काळजी करण्याची गरज नाही, काही तेल आणि हेअर मास्क वापरून आपण केसांना पुन्हा मुलायम, चमकदार करू शकतो, त्याविषयी (Hair Care Tips for Holi 2022) जाणून घेऊ.

खोबरेल तेल 
होळीमध्ये रंग खेळण्यापूर्वी केसांना खोबरेल तेल लावल्याने केसांना रंग चिकटत नाही. तसेच, धुताना त्यामुळे रंग सहजपणे निघून जातो. यासोबतच खोबरेल तेलात व्हिटॅमिन-ई आणि फॅटी अॅसिड आणि इतर सर्व पोषक घटक असतात, जे केसांना पोषण देतात. त्यामुळे होळी खेळण्यापूर्वी केसांना खोबरेल तेल लावणे फायदेशीर ठरेल.

मोहरीचे तेल
मोहरीचे तेल पारंपारिकपणे अनेक समस्यांवर उपयोगी आहे. होळी- रंगपंचमी खेळण्याच्या अर्धा तास आधी केसांना मोहरीचं तेल लावल्यास केसांवर रंग राहत नाही. तसेच, धुताना कोणत्याही शॅम्पूच्या वापराने हे रंग सहज काढता येतात. त्यामुळे होळीमध्ये रंग खेळण्याच्या तासभर आधी केसांमध्ये मोहरीचे तेल लावले तर त्यामुळे रंगांचा केसांवर परिणाम होणार नाही.

लिंबू आणि ऑलिव्ह ऑइल हेअर मास्क
ऑलिव्ह ऑइल हे केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण त्यात लिंबू घातल्यास त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतात. होळीमध्ये रंग खेळण्यापूर्वी लिंबू आणि ऑलिव्ह ऑईल मिसळून बनवलेला हेअर मास्क लावा. यामुळे केसांचे रंगांपासून संरक्षण तर होतेच पण उत्तम पोषणही मिळते. 

Web Title: hair care tips during Holi color festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.