तुम्हाला माहीत आहे का?, केसांना कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 12:11 PM2019-08-06T12:11:42+5:302019-08-06T12:16:35+5:30
केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांसोबतच अनेक घरगुती उपायही केले जातात. पण आपल्यापैकी अनेकजण केसांसाठी शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करतातच.
केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांसोबतच अनेक घरगुती उपायही केले जातात. पण आपल्यापैकी अनेकजण केसांसाठी शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करतातच. तसेच अनेकदा तज्ज्ञांकडूनही सल्ला दिला जातो की, केस हेल्दी ठेवण्यासाठी आणि डॅमेजपासून वाचवण्यासाठी कंडिशनर फार मदत करतं. त्यामुळे शॅम्पूनंतर केसांसाठी योग्य ते कंडिशनर नक्की लावलं पाहिजे. पण आपल्यापैकी बऱ्याचजणांना कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत माहीत नसते. आज आम्ही तुम्हाला केसांना कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.
स्टेप 1
सर्वात आधी केस शॅम्पूच्या मदतीने स्वच्छ धुवून घ्या. जर केसांना तेल लावलं असेल तर केस दोन वेळा व्यवस्थित धुवून स्काल्प आणि केस स्वच्छ करून घ्या, त्यामुळे केसांवर कंडिशनरचा परिणाम होऊ शकेल.
स्टेप 2
केस हलके ड्राय करा. जास्त पाणी असेल तर कंडिशन केसांना न लागता पाण्यासोबत निघून जाऊ शकतं.
स्टेप 3
आता कंडिशनर दोन्ही तळव्यांवर घ्या. लक्षात ठेवा की, कंडिशनरचं प्रमाण केसांच्या ग्रोथनुसार घ्या.
स्टेप 4
केस एका साइडला घ्या आणि तळव्यावर घेतलेलं कंडिशनर केसांच्या मिड लेन्थपासून टिपपर्यंत लावा. कंडिशनर लावताना केस जास्त ओढले जाणार नाहीत याची काळजी घ्या. नाहीतर जास्त हेअर फॉल होईल. तसेच कंडिशनर स्काल्पला लावू नका.
स्टेप 5
कोम्बच्या मदतीने हे केसांमध्ये व्यवस्थित पसरवून घ्या. त्यामुळे ते संपूर्ण केसांना व्यवस्थित लावलं जाईल.
स्टेप 6
1 ते 2 मिनिटांपर्यंत कंडिशनर केसांवर तसचं राहू द्या आणि त्यानंतर हलक्या हाताने केस धुवून टाका.
केस धुतल्यानंतर हलक्या हाताने टॉवेलने केस कोरडे करा. जास्त जोर लावू नका. नाहीतर कंडिशनरचा फायदा होणार नाही. तसेच केस लगेच फ्रिजी होतील. केस लगेच ब्लो-ड्राय करू नका. त्यामुळे केसांची शाइन आणि कंडिशनरचं पोषण तसचं राहण्यास मदत होईल.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.