गळणाऱ्या आणि पांढऱ्या केसांना वैतागलात? एक्सपर्ट्सनी दिलेल्या ५ उपायांनी समस्या होतील दूर
By manali.bagul | Published: December 11, 2020 03:30 PM2020-12-11T15:30:29+5:302020-12-11T15:50:21+5:30
Beauty Tips in Marathi : डोक्यातील कोंडा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग आहे जो सामान्यत: हवामानातील बदलांमुळे, टाळूवरील घाण किंवा टाळूमध्ये कमी रक्त संचारांमुळे होतो.
आपले केस डोक्यावरील क्राऊनप्रमाणे असतात. केसांच्या सौंदर्यामुळे आपण नेहमी तरूण आणि सुंदर दिसत असतो. बदलत्या वातावरणात वाढतं प्रदूषण, आहार व्यवस्थित न घेणं यामुळे केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. आयर्नची कमतरता, बायोटीनची कमतरता तसंच अनुवांशिक कारणांमुळे केसप पांढरे होणं, कोंडा होणं या समस्येचा सामना करावा लागतो. ओन्ली माय हेल्थशी बोलताना इंटरनॅशनल स्पोर्ट्स डायटीशियन तज्ज्ञ स्वाती बथवाल यांनी गळत्या केसांना रोखण्यासाठी कशी काळजी घ्यायची याबाबत सांगितले आहे.
केसांचे गळणं थांबवण्यासाठी घरगुती उपाय
केस गळती टाळण्यासाठी आपण आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी आणि बायोटिनची कमतरता पूर्ण करणे महत्वाचे आहे. जर आपल्या शरीरात या घटकांची कमतरता असेल तर आपण डॉक्टरांना देखील विचारू शकता आणि त्यांनी सुचविलेले पूरक आहार घेऊ शकता, जेणेकरून शरीरातील या घटकांची कमतरता दूर होईल. दही, मसूर, मूग, अंडी, दूध यांसारखे प्रोटिनयुक्त आहार घेत केस गळणे कमी करता येते. दररोज सकाळी 2 चमचे तीळ खा. जेणेकरून तुमच्या शरीरावर कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोहाची चांगली मात्रा मिळेल. याशिवाय ताण कमी करण्यासाठी तुम्ही तुळस-आले किंवा कॅमोमाइल चहा देखील पिऊ शकता.
कोंडा दूर करण्यासाठी
डोक्यातील कोंडा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग आहे जो सामान्यत: हवामानातील बदलांमुळे, टाळूवरील घाण किंवा टाळूमध्ये कमी रक्त संचारांमुळे होतो. डँड्रफच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपण आपल्या आहारात व्हिटॅमिन बी 6 समाविष्ट करणे आवश्यक आहे.
पांढरे केस
केस पांढरे होणं रोखण्यासाठी आपण पोषक आहार घेणं महत्वाचे आहे. टाळूच्या त्वचेच्या खालच्या भागात मेलानोसाइट्स नावाच्या पेशी असतात, जे केसांच्या रंगासाठी जबाबदार असतात. हे पेशी जास्त ताण, हार्मोन्सचे असंतुलन, कोणतीही वैद्यकीय समस्या इत्यादीमुळे मरतात, ज्यामुळे केस पांढरे होणे सुरू होते.
याशिवाय जास्त प्रदूषण, जास्त चरबीयुक्त आहार, प्रक्रिया केलेले मांस किंवा साखर खाण्यामुळे केसांचा रंग बदलू शकतो. केस दीर्घकाळ चांगले ठेवण्यासाठी चांगला आहार आणि चांगली जीवनशैली ठेवावी लागते.
स्वयंपाक घरात असलेल्या कडीपत्त्याचा वापर करून तुम्ही केस पांढरे होण्यापासून रोखू शकता. त्यानंतर कढिपत्ता दोन ते तीन तासांसाठी भिजवत राहू द्या. त्यानंतर या पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करा. तसंच कढिपत्त्याचा रस काढून त्याला नारळाच्या तेलात एकत्र करून घ्या. हे तेल केसांना लावल्यास फरक दिसून येईल तसंच केसांना पोषण मिळण्यास मदत होईल.
आवळ्याचा वापर सौंदर्य प्रसाधनात आणि केसांच्या उत्पादनात पुर्वापारपासून केला जात आहे. जेव्हा तुम्ही मेहेंदी लावता त्यावेळी त्यात आवळ्याची पावडर घाला. तसंच आवळ्याची पेस्ट करून केसांना लावल्यास केस पांढरे होण्याची समस्या दूर होईल. जर तुम्ही आवळ्याची पावडर किंवा आवळ्याचा रस नारळाच्या तेलात मिक्स करून लावाल तर फरक दिसून येईल.
कांद्याची पेस्ट केसांसाठी गुणकारत ठरते. जर तुम्ही कांद्याचा रस किंवा काद्यांची जाडसर पेस्ट करून केसांच्या मुळांना लावाल तर समस्या नक्की दूर होईल. जर तुम्हाला कांद्याची पेस्ट लावण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. तुम्ही केसांवर कांद्याचा वापर करण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर साल काढून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि केसांना लावा. यामुळे केसांच्या मुळांमध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होते. त्यामुळे केसांची वाढ चांगली होते. तसंच केस पांढरे होणं थांबतं.
हिवाळ्यात फाटलेल्या ओठांमुळे चेहऱ्याचा लूक बिघडतोय? या टिप्सने कोरड्या ओठांसह काळपणा होईल दूर
केस वाढवणं
जर तुम्हाला केस वाढवायचे असतील तर आपले केस नारळाच्या दुधाने धुवा. याशिवाय केसांची लांबी वाढविण्यासाठी अंडी, मसूर, दही, दूध, शेंगदाणे आणि बिया इत्यादींसह प्रथिनेयुक्त आहार देखील आवश्यक आहे. केसांच्या चांगल्या वाढीसाठी आपण आपल्या आहारात मल्टीग्रेन पीठ (नाचणी, ज्वारी, बाजरी, ओट्स,), सूर्यफूलाच्या बियांचा देखील समाविष्ट केले पाहिजे. 250 ग्रॅम मोहरीच्या तेलात 60 ग्रॅम रोझमेरीची पाने घाला आणि कमी गॅसवर उकळवा. हे तेल थंड झाल्यावर बाटलीत भरून आठवड्यातून एकदा आपल्या डोक्यावर मसाज करा. हे केसांची लांबी वाढविणे सुरू करेल. 'या' ५ कारणांमुळे कमी वयातच गळतात आयब्रोजचे केस; जाणून घ्या गळत्या केसांना रोखण्याचे उपाय