गरम पाण्यामुळे केस रुक्ष झाले आहेत? वापरा हे घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 12:49 PM2018-11-23T12:49:43+5:302018-11-23T12:50:35+5:30

आता सगळीकडे थंडीला सुरुवात झाली असून त्यासोबतच त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांनाही सुरुवात झाली आहे.

Hair due to hot water has become dry and damage, use these home remedies | गरम पाण्यामुळे केस रुक्ष झाले आहेत? वापरा हे घरगुती उपाय

गरम पाण्यामुळे केस रुक्ष झाले आहेत? वापरा हे घरगुती उपाय

googlenewsNext

आता सगळीकडे थंडीला सुरुवात झाली असून त्यासोबतच त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांनाही सुरुवात झाली आहे. थंडी म्हटली की, बहुतेक सगळेजणच आंघोळीसाठी गरम पाण्याल्या प्राधान्य देतात. पण या दिवसात काहीजणांना गरम पाण्याने कस धुतल्याने वेगवेगळ्या समस्या होतात. गरम पाण्यामुळे अनेकांचे केस रुक्ष आणि निर्जीव होतात. अशात ही समस्या दूर कशी करायची याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला देतोय.

हे असू शकतं कारण

काही लोकांचे केस हे जन्मापासूनच रुक्ष, शुष्क आणि कुरळे असतात. पण काही लोक आपले केस सुंदर करण्यासाठी अनेकप्रकारच्या रासायनिक पदार्थांचा वापर करतात. त्यामुळे केसांच्या वेगवेगळ्या समस्या होतात. हिवाळ्यात जास्तीत जास्त लोक हे आंघोळीसाठी गरम पाणी वापरतात. पण सतत गरम पाण्याचा वापर केल्याने केस रखरखीत आणि निर्जीव होतात. 

चहापत्तीचं पाणी

चहापत्तीच्या पाण्याने केस धुतल्याने केसांचा नैसर्गिक रंग कायम राहतो. यासाठी तुम्हाला नियमीतपणे शॅम्पू केल्यावर चहापत्तीच्या पाण्याने केस धुवावे लागतील. याने तुमचे केस मॉइश्चराइज होण्यासोबतच केसांना अतिरीक्त पोषणही मिळतं. 

मेथी

हिवाळ्यात केसात कोंडा होणे ही सामान्य समस्या आहे. जर तुम्हाला केसात कोंडा होण्याची समस्या असेल किंवा केस रखरखीत झाले असतील तर मेथीचा वापर करु शकता. यासाठी तुम्हाला ४ मोठे चमचे मेथीच्या बीया हव्या असतील. या मेथीच्या बीया रात्रभर पाण्यात भिरवून ठेवा आणि सकाळी त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आंघोळीच्या ३० मिनिटांआधी केसांना लावा आणि नंतर तुमच्या नेहमीच्या शॅम्पूने केस धुवावे. हा केसांची समस्या दूर करण्याचा सर्वात चांगला घरगुती उपाय मानला जातो. पण ज्यांना उष्णतेचा त्रास होतो, त्यांनी मेथीचा वापर करु नये. कारण मेथी उष्ण असते आणि याने समस्या वाढू शकते. 

आवळा पावडर

शुष्क आणि निर्जीव केसांसाठी वरदान मानला जातो. आवळा केसांसाठी चमत्कारिक औषध मानलं जातं. याने केसांना भरपूर पोषण मिळतं. रखरखीत आणि निर्जीव केसांवर उपचार करण्यासाठी २ मोठे चमचे आवळा पावडर आणि २ चमचे लिंबाचा रस मिश्रित करा. ही पेस्ट केसांना लावा. १० ते १५ मिनिटांनी कोमट पाण्याने केस धुवावे.
 

Web Title: Hair due to hot water has become dry and damage, use these home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.