हिवाळ्यात अधिक होते केसगळतीची समस्या? 'या' घरगुती उपायांनी घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 11:30 AM2022-12-02T11:30:51+5:302022-12-02T11:31:52+5:30

हिवाळ्यात जास्तीत जास्त लोक पाणी पिणं कमी करतात. त्याऐवजी गरम चहा किंवा कॉफीचं सेवन अधिक प्रमाणात करतात. त्यामुळे शरीरात बदल होतात आणि केसगळती होऊ लागते.

Hair falls most winter follow these tips avoid hair fall | हिवाळ्यात अधिक होते केसगळतीची समस्या? 'या' घरगुती उपायांनी घ्या काळजी!

हिवाळ्यात अधिक होते केसगळतीची समस्या? 'या' घरगुती उपायांनी घ्या काळजी!

Next

वातावरणात आता बदल होत आहे. जास्त नसेल तरी थोडी थंडी जाणवायला लागली आहे. थंडी जसजशी वाढत जाईल केसगळतीही अधिक वाढेल. या थंडीच्या वातावरणात अनेकांना केसगळतीची समस्या होते. त्यामुळे गरजेचं आहे की, केसांची काळजी घेण्यासाठी काही खास गोष्टीही कराव्या. चला जाणून घेऊ थंडीच्या दिवसात केसगळती थांबवण्यासाठी काही खास घरगुती उपाय...

हिवाळ्यात जास्तीत जास्त लोक पाणी पिणं कमी करतात. त्याऐवजी गरम चहा किंवा कॉफीचं सेवन अधिक प्रमाणात करतात. त्यामुळे शरीरात बदल होतात आणि केसगळती होऊ लागते. असं नाहीये की, केसगळतीची समस्या या वातावरणात केवळ महिलांनाच होते. पुरूषांचे देखील केस गळतात. त्यांच्या टॉवेलवरही केस दिसू लागतात.

गरम पाण्याने धुवू नये केस

थंडीच्या दिवसात सामान्यपणे लोक आंघोळीसाठी गरम पाण्याचाच वापर करतात. पण केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर अजिबात करू नये. जर पाणी जास्तच थंड असेल तर त्यात थोडं गरम पाणी टाकून कोमट करा. जास्त गरम पाण्याने केस धुतल्यास केस कमजोर होतात आणि केसगळती होऊ लागते.

तेल लावणं गरजेचं

केस मजबूत करण्यासाठी आणि योग्य ते पोषण मिळण्यासाठी केसांना तेल लावणं फार गरजेचं आहे. केसांना तेल लावण्याचे दोन फायदे होतात. एक म्हणजे केस मजबूत होतात दुसरा असा की, त्वचा उजळते. त्यामुळेच आठवड्यातून कमीत कमी दोनदा तेलाने केसांची मसाज करा. तेल लावण्याआधी थोडं गरम करा, याने केस मुळातून मजबूत होती.

कापूरही ठरतो फायदेशीर

पूजेसाठी वापरला जाणारा कापूर केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फारच फायदेशीर ठरतं. या वातावरणात हेअर ऑयलिंग आणखी फायदेशीर होईल. यासाठी तेलात थोडा कापूर बारीक करून टाका. कापूर लगेच तेलात मिसळेल आणि या तेलाने केसांची मुळं मजबूत होतील. तसेच याने केसांमधील डॅंड्रफही दूर होती.  

भरपूर पाणी प्यावे

पाणी पिणं आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठीही गरजेचं असतं. दिवसभरात कमीत कमी बारा ग्लास पाणी आवर्जून प्यावे. हिवाळ्यात तहान कमी लागते म्हणून कमी पाणी पिऊ नये. हवं तर तुम्ही गरम पाणी पिऊ शकता, याने तुम्ही हायड्रेट रहाल आणि शरीरातील चरबी कमी करण्यासही मदत मिळेल. 

तूप खाणं सुरू करा

आरोग्यासाठी हिवाळा हा ऋतू सर्वात चांगला मानला जातो. या वातावरणात खाल्लेलं सगळं शरीराला मानवतं. त्यामुळे तुम्ही जर आहारात तूप, लोण्याचा समावेश कराल तर याचा तुम्हाला फार फायदा होईल. तूप तर केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. याने केस काळे राहतात.

Web Title: Hair falls most winter follow these tips avoid hair fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.