न्यूट्रिशनिस्टने सांगितला केसगळती थांबवण्याचा बेस्ट उपाय, एकदा कराच मग बघा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 11:12 AM2024-09-10T11:12:00+5:302024-09-10T11:15:27+5:30
Hair Care Tips : केस लांब आणि मजबूत करण्यासाठी न्यूट्रिशनिस्टने एक खास उपाय सांगितला आहे. न्यूट्रिशनिस्ट सिमरन कथूरिया यांनी याबाबत इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Hair Care Tips : केसगळतीची कारणे वेगवेगळी असू शकतात. काही लोकांचा केस योग्य ती काळजी न घेतल्याने कमी वयातच गळू लागतात. अशात कमी वयातच टक्कल पडण्याची समस्या होते. केसगळती थांबवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. पण सगळ्यांनाच यातून फायदा मिळतो असं नाही. वेगवेगळ्या केमिकल्समुळे केसांचं अधिक नुकसान होतं. पण जर केस शरीरातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे गळू लागले असतील तर कोणतेही उपाय कामी येणार नाहीत. अशात केस लांब आणि मजबूत करण्यासाठी न्यूट्रिशनिस्टने एक खास उपाय सांगितला आहे. न्यूट्रिशनिस्ट सिमरन कथूरिया यांनी याबाबत इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
केस वाढवण्याचा सोपा उपाय
न्यूट्रिशनिस्टनुसार, केस वाढवण्याच्या आणि केसगळती थांबवण्याचा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला भोपळ्याच्या बीया, सूर्यफुलाच्या बीया, काळे तीळ आणि मधाचं गरज लागेल. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये सूर्यफुलाच्या बीया, भोपळ्याच्या बीया भाजून घ्या. नंतर या सगळ्या बीया मधात मिक्स करा. हे मिश्रण रोज सेवन केलं तर केसांची वाढही चांगली होते आणि केसगळतीही थांबते.
काय होतात फायदे?
- सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर असतं जे एक शक्तीशाली अॅंटी-ऑक्सिडेंट आहे आणि केसांचा ऑक्सीडेटिव स्ट्रेसपासून बचाव करतं. यामुळे केसांचं डॅमेज कमी होतं. डोक्याची त्वचाही निरोगी राहते.
- भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स जसे की, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस, आयर्न आणि कॉपर भरपूर असतं. या बियांचं सेवन केल्याने केस वाढण्यास आणि रिपेअर होण्यास मदत मिळते. या बियांमध्ये झिंकही भरपूर असतं. यामुळे केसगळती थांबते आणि केसांची वाढही चांगली होते.
- काळ्या तिळांचेही अनेक फायदे आहेत. यांनी केअर फॉलिकल्सला पोषण मिळतं. केसांची वाढ वेगाने होते. तसेच केस लवकर पांढरे होत नाहीत.